पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रति,
मा.ना.उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय:- कोरोना काळात महावितरण, महानिर्मिती व महापारेषण वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापराकरिता 100 युनिटपर्यंत प्रतिमाह व कृषीसाठी वापरासाठी 100 टक्के मोफत असे तीन महिने वीज बिलात सवलत देऊन नागरिकांना दिलासा देण्याबाबत विनंती.
महोदय,
कोरोना सारख्या महामारीने सर्व जगावरच संकट आले असून भारत खंबीरपणे या महामारीशी सामना करीत आहे यामध्ये विविध राज्यांचे योगदान लाख मोलाचे आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढ होताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्र महामारीतून लवकरच सावरेल असा विश्वास आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात फेब्रुवारी महिन्यापासून अचानक लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व कामधंदे ठप्प झाले असून अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे.शहर व ग्रामीण भागात नियमित मजुरी करणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्याप्रमात आहे. त्यांच्यावर खूप वाईट परिस्थिती आली आहे. केंव्हा लॉकडाउन संपून कामावर परतावे असे सर्वांनाच वाटत आहे.
फेब्रुवारीपासून सगळेच घरी असल्याने जवळ असलेली तुटपुंजी रक्कम आता संपली असून आता पुढे काय याची चिंता नागरिकांना सतावत आहे. घरामध्ये बंदीस्त असल्याने व उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील विजेची उपकरणे रात्रंदिवस वापराने भाग पडत आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला असून येणाऱ्या काळात किती वीज बील येईल वीज बील न भरल्यामुळे आपली वीज कापणार तर नाहीत ना याची चिंता नागरिकांना सतावत आहे.
महाराष्ट्रात महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन कंपन्या अस्तित्वात असून मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. सध्या महावितरण १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो. कोरोना संकटामुळे सर्वच घरी असल्याने व शेती करण्याची मुभा दिल्याने घरगुती व कृषी वापर वाढला आहे. आपल्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकार येत्या काळात 100 युनिटपर्यंत वीज बील माफ करण्यासाठी प्रयत्न करत असून नागरिकांना दिलासा देणारा निर्णयाचे नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
परंतु कोरोनामुळे नागरिकांच्या हाताला काम नसल्याने पुढील तीन महिण्याकरिता घरगुती वापराकरीता 100 युनिट प्रतीमहा वीज व कृषी वापराकरीता 100 टक्के वीज बील माफ करण्यासाठी आपण प्रयत्न करून नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती.
कळावे,
आपला
आबा बागुल
प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
9822015479
मा.उल्हास पवार
मा.अध्यक्ष म्हाडा
मा.जयेंद्र किराड
सामाजिक कार्यकर्ते