आंबेडकरांवरील पुस्तके वाचून भीमजयंती साजरी करणार* --------------------------------------- *लोकजनशक्ती पार्टी कार्यकर्त्यांचा संकल्प*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note                                                                                                                                      *डॉ आंबेडकरांवरील पुस्तके वाचून भीमजयंती साजरी करणार*
---------------------------------------
*लोकजनशक्ती पार्टी कार्यकर्त्यांचा संकल्प*


पुणे:


कोरोना लॉक डाऊन निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रम न करता ,घराबाहेर न पडता डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके ,लेख आणि आंबेडकरांवरील पुस्तके वाचून घरीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक जयंती साजरी करणार असल्याचा संकल्प लोकजनशक्ती पार्टी कार्यकर्त्यांनी केला आहे.या उपक्रमात कार्यकर्त्यांनी कुटुंबियांना सहभागी करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.दर वर्षी प्रमाणे उत्साहात भीम जयंती साजरी करता येत नसली तरी रस्त्यावर न येता प्रशासनाला सहकार्य करणार आहोत,असे संजय आल्हाट यांनी सांगितले.
-------------------------------------------------------