दिलासादायक बातमी....  डॉ धाडवड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह कर्जत;मुरबाड यांचे टेंशन झाले कमी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दिलासादायक बातमी.... 

डॉ धाडवड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह

कर्जत;मुरबाड यांचे टेंशन झाले कमी

कर्जत,ता.23  गणेश पवार

                             नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र धाडवड यांची तसेच त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.21 एप्रिल रोजी मुंबई येथून कस्तुरबा रुग्णालय येथून आलेल्या आरोग्य पथकाने त्यांचे स्लॅब चे नमुने घेतले होते.दरम्यान,रात्रीच त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले असून ते निगेटिव्ह असून या अहवालामुळे कर्जत आणि मुरबाड तालुक्याचे टेंशन कमी झाले आहे.मात्र यानिमित्ताने त्यांचा अंबरनाथ येथे असलेला भाऊ खरेच कोरोना पॉझिटिव्ह आहे काय?हा प्रश्न उपस्थित होत असून कोरोना ची भीती म्हणून डॉ धाडवड यांनी स्वतःला कोरोन्टाईन करून घेण्यासाठी हे कुभांड रचले होते काय?याची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य करीत आहेत.                

                             अंबरनाथ येथे राहणाऱ्या आपल्या भावाला भेटायला 14 एप्रिल रोजी गेले होते आणि तेथून येऊन डॉ धाडवड यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन 15 एप्रिल पासून 17 एप्रिल पर्यंत डॉ धाडवड यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली आहे.डॉ धाडवड यांच्या भावाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ धाडवड यांना कोरोन्टाइन व्हायला लावले.त्यांना तात्काळ कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले असताना देखील त्यांनी 20 एप्रिल पर्यंत टेस्ट केली नव्हती.त्याबाबत सर्वत्र गोंगाट सुरू झाल्याने आणि कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मुरबाड चे तहसीलदार अमोल कदम यांना डॉ धाडवड यांचा पत्ता आणि त्यांची पार्श्वभूमीबद्दल लेखी पत्र देऊन माहिती दिली होती.आज 21 एप्रिल रोजी मुरबाड तहसीलदार यांच्या आदेशाने तेथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोऱ्हाटे हे डॉ धाडवड राहत असलेल्या साई संसार रेसिडेन्सी येथे जाऊन त्यांना कोरोना टेस्ट करायला लावली. त्यांचे स्लॅब हे मुंबई येथून आलेल्या आरोग्य यंत्रणेने नेले होते आणि त्यांचा रिपोर्ट रात्री आला असून डॉ धाडवड पती पत्नी यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

                               मात्र नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर ज्याप्रमाणे घाबरले आहे,त्या प्रमाणे मुरबाड तालुका देखील टेंशन मध्ये होते. कारण डॉ धाडवड हे त्यांच्या पत्नीसह अंबरनाथ येथे 14 एप्रिल रोजी गेले होते आणि डॉ धाडवड यांची पत्नी या  मुरबाड तालुक्यातील तालुक्यातील शिरोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहेत.त्यात नेरळ येथून कोरोन्टाइन व्हायला सांगितल्यावर ते मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात देखील जाऊन बसायचे. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मग कर्जत तालुका नाहीतर मुरबाड तालुक्यातील शेकडो लोकांची तपासणी करावी लागणार आहे.ही भीती लक्षात घेऊन कोरोना टेस्ट करण्यास टाळाटाळ करीत असलेले डॉ धाडवड यांना आज मुरबाड तहसीलदार यांनी पोलीसांच्या माध्यमातून कोरोना टेस्ट करून घेता आली आहे.मात्र आता त्या टेस्टचे रिपोर्ट काय येतात?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

                             नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता परदेश दौरे करून आलेले लोक नेरळ परिसरात आल्यानंतर कोरोना आपल्याला होईल या भीतीने ग्रासलेले डॉ धाडवड हे शक्यतो गाडीतून उतरत नव्हते.ते त्या त्या वेळी आपल्या कर्मचारी यांना सांगून त्या संशयीत यांची तपासणी करायला पाठवायचे. त्यामुळे त्यांना स्वतःला कोरोना ची भीती असायची अशी चर्चा आरोग्य खात्यात आहे.त्यामूळे डॉ धाडवड यांचे भाऊ खरेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत काय?हे तपासावे लागणार आहे.अंबरनाथ येथील तहसीलदार यांच्याशी कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांनी त्या बाबतीत शहानिशा करण्याची गरज आहे.त्यामुळे कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील शेकडो लोकांना कोरोना चे उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या डॉ धाडवड यांची चौकशी व्हायला हवी,अशी मागणी कर्जत तसेच मुरबाड तालुक्यातुन होत आहे.