स्वतः स्पीकर लावून लोकांनी बाहेर न पडण्याचे आव्हान नगरसेवक हाजी गाफुर पठाण करीत आहेत*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*स्वतः स्पीकर लावून लोकांनी बाहेर न पडण्याचे आव्हान नगरसेवक हाजी गाफुर पठाण करीत आहेत*


पुणे --- कोरोणा व्हायरस उपाययोजना म्हणून कोंढवा सारख्या गर्दी आणि दाट लोकवस्ती च्या ठिकाणी नगरसेवक हाजी गफू र  पठाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने गाडी व स्पीकर लावून दाट आणि गर्दीच्या ठिकाणी व वस्त्त्या वाड्यामध्ये जाऊन घराचे बाहेर पडू नये म्हणून आवाहन करीत आहेत .तसेच यावेळी स्वतः माईकवरून लोकांना स्वच्छ ता आणि सुरक्षिततेचे आव्हान ते करीत आहेत .नागरिकांना sanitaizer वापरण्याबरोबराच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ते करीत आहेत.शिवाय निष्कारण रस्त्यावर थांबणाऱ्या घरी बसण्याची स्वतः विनंती करून संपूर्ण कोंढवा परिसर ते पिंजून काढीत आहेत .नागरिक आणि महिलांनी दुकानासमोर गर्दी ना करता टप्प्ाटप्प्याने जीवनावश्यक वस्तू घ्यावे यासाठी आग्रह करीत आहेत .सध्याच्या परिसथितीत फारच कमी लोक रस्त्यावर येऊन प्रशासनाला मदत करीत आहेत त्यामध्ये पठाण यांचा समावेश होतो.
कोरोना व्हायरस या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  haydro clorofaid ची फवारणी केली.अॅड.हाजी गफुर पठाण स्वतः थांबुन निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ करुन घेत आहे.
या संकटकाळी धैर्याने कार्यरत असलेल्या पुणे मनपा आरोग्य विभाग कर्मचारी आणि अधिकारी यांना स्वतः सामील होऊन मदत करीत आहेत .आतापर्यंत कोंढवा परिसर फवारणीचे काम चालू आहे .तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून स्वतःच्या खर्चाने गाडी लावून स्वतः लोकांना आवाहन करीत आहेत .त्यामुळे कोंढवा परिसरातील नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे .