*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
ति ला महिला दिनाच्या दिवशीच पुणे म.न.पा. ला वकीला मार्फत नोटीस पाठवणे भाग पडले
स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली अतिक्रण निरीक्षक वारजे क्षेत्रिय कार्यालय, कोथरुड यांनी श्रीमती गायत्री भंडारी यांचा निरा विक्रीचा स्टॉल काढल्यामुळे एका विधवा व अनाथ असल्या महिलेवर महिला दिनाच्या दिवशीच पुणे म.न.पा. च्या अतिक्रमण विभागाच्या आयुक्त सहाय्यक आयुक्त व वारजे क्षेत्रिय कार्यालय, कोथरुडच्या अतिक्रमण निरीक्षकांनकडुन अन्याय झाल्याने वकीलांमार्फत नोटीस पाठवणे भाग पडले.
पती रामदास भंडारी गेल्या २०१४ साली अकस्मात वारल्यामुळे व आई वडील व इतर नातेवाईकांचे छत्र नसल्यामुळे पतीचे बिग बझार, सिटी पा्रईड समोर असलेल्या ठिकाणी निरा विक्रीचे दुकान लावले परंतु सबंधीत विभागाच्या नगरसेवकाच्या सांगण्यावरुन कारवाई करुन व्यवसाय बंद करण्यात आला. त्यानंतर पुणे म.न.पा. चे उंबरठे झिजवल्यानंतर सुमारे दोन वर्षे पाठपुरावा करुन हातगाडी पथारी नोंदणी प्रमाणपत्र काढण्यात आले. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळुन ति ची गाडी रुळावर येण्याच्या बेतात असतांना अतिक्रमण निरीक्षक यांनी चाणाक्षपणे श्रीमती. भंडारी यांना स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली त्यांचा निरा विक्रीचा स्टॉल निर्जन ठिकाणी ठेवण्यात आला मालाचा खर्चही न निघाल्यामुळे स्टॉल (फोटो मध्ये दाखविल्यानुसार ) तसाच ठेवण्यात आलेला आहे.
सदरच्या पुर्वीच्या व्यवसायाच्या ठिकाणी मा. अतिक्रमण निरीक्षकांच्या मेहबानीने अन्य अनाधिकृत व्यवसायीक मात्र राजेरोसपणे व्यवसाय करीत असल्याचे दिसुन आल्यावर वारंवार सबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना फोन करुन ऑनलाईन, लेखी तक्रारी करुन (अधिकारी यांनी तात्पुरती कारवाई केली) परंतु ठोस कारवाई न केल्यामुळे आज ति ला अधिकारी, प्रशासन यांनी काहीही ऐकुन घेतल्याने ति ला महिला दिनाच्या दिवशीचे वकीलांमार्फत नोटीस पाठवुन न्यायालयाचे दार ठोठावण्यास भाग पडलेले आहे. प्रतिक्षा आहे ती आता न्यायालयाच्या निर्णयाची ? की काय होणार ति चे कि काय होणार ति च्या चिमुकल्याचे.
आपणास शक्य वाटल्यास प्रशासनाच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे व्हॉअसपवर मेसेज पाठविल्यास ति ला न्याय मिळाल्यास आपणास एक मनस्वी समाधान लाभेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*