अंत्यविधी व अन्य धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी टाळण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन",

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,


" अंत्यविधी व अन्य धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी टाळण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन",
सद्यःस्थितीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्तिथीचा विचार करता पुणे महानगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक सर्व पातळ्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत,
शहरात होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी सर्वोतोपरी गर्दी टाळणेकरिता यशस्वी प्रयत्न केले जात आहेत,
तथापि अंत्यविधी व तदनंतर होणारे धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
तरी कृपया वरीलप्रमाणे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की सद्यस्थिती बाबत विचार करून सर्वांनी मिळूनच गर्दी नियंत्रणात व आटोक्यात आणणे करिता प्रयत्न करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी केले आहे,
मयतांचे मृत्यूपास,व मृत्यूदाखले मिळणे बाबत त्वरेने पूर्तता होईल,
---------
सिंहगड रस्ता परिसरात सर्वेक्षण,
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने आज सिंहगड रस्ता,पु,ल,देशपांडे उद्यानासमोरील परिसरात घरोघरी भेटी देउन मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली,
सुमारे २५४ घरांना भेटी देउन ८१७,नागरिकांशी संवाद साधण्यात आला,
सर्वेक्षण करण्यापूर्वी पथकातील समूहसंघटिका,आरोग्य कर्मचारी,नर्सेस,व अन्य कर्मचाऱयांना डॉ, दीपक पखाले,डॉ, वीर,यांनी मार्गदर्शन केले,व पथकासह घरोघरी भेटी देण्यात आल्या,
-------//
कै, बा,स,ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने औषध फवारणी,
कै, बा,स,ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने आज डॉ, नायडू रुग्णालयात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली,
तसेच मा,विभागीय आयुक्त कार्यालय परिसर व बाहेरील परिसरात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली,
-----------
मनपाच्या १५, क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय पथकाकरिता मनपाच्या वाहन विभागाकडून स्वतंत्र १५,वाहने वाहन चालकांसह देण्यात आली,
---संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महापालिका,
१७/०३/२०,