रोटी डे’ १ मार्च रोजी दर वर्षी हडपसरमध्ये मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


रोटी डे' उत्साहात साजरा 


हडपसर टीम या संस्थेचा अनोखा उपक्रम


                     वर्षभर आपण वेगवेगळे ‘डे’ साजरे करून आनंदाची अनुभूती घेणाऱ्यांना ‘हडपसर टीम’ या संस्थेने या वर्षी ही मोठया प्रमाणात ‘रोटी डे’ साजरा करण्यात आला. अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा ‘रोटी डे’ १ मार्च रोजी जर वर्षी हडपसरमध्ये मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हजारो गरजूंना, उपेक्षितांना एक वेळचे भोजन उपलब्ध करून हडपसर टीमने दिले. अशी माहिती ‘हडपसर टीम’ने दिली.


         प्रेम डे, मैत्री डे, गुलाब डे  असे विविध डे समाजात साजरे होत असतात. त्यात तरुण उत्साहाने सहभागी होत असतात. हे दिवस साजरा करणाऱ्या तरुणाईबरोबरच समाजातील सर्वांनीच  सामाजिक भान बाळगून एक दिवस दुसऱ्याला अन्न द्यावे अशी ‘रोटी डे’मागील कल्पना आहे. त्यातूनच १ मार्च हा ‘रोटी डे’ म्हणून करण्याच्या कल्पनेची आखणी झाली आहे.


           या उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी आपल्या जवळच्या कोणत्याही  गरजूला रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी आणि भाजी किंवा चटणी  जे शक्य असेल ते लोकांकडून जमा करून हडपसर गाव, रामटेकडी, वैदवाडी, गोसावी वस्ती गाडीतळ व परशुराम आबाजी जगताप अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी ‘हडपसर टीम’ने अन्नदान केले.


 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*