पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे, दि. 14- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट कर्नल प्रेरणा शंकर यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, छावणी परिसरात लष्करी शिस्त असल्याने स्वच्छतेबाबत अधिकाधिक काळजी घेतली जाते. तथापि, कोरोनाचा संसर्ग इतर आजारांपेक्षा अधिक वेगाने होत असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. छावणी परिसरातील विद्यार्थी, नागरिक यांना कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सांगितले जावे, असेही ते म्हणाले.
मेजर जनरल नवनीत कुमार यांनी कॅण्टोन्मेंट प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. जिल्हा प्रशासनास आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.