*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कृपया प्रसिद्धीसाठी
प्रति,
माननीय संपादक,
दैनिक......
दिनांक ०४ मार्च १९७० साली पिंपरी चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाली होती. हवेली तालुक्याचे तत्कालीन प्रथम आमदार स्वर्गीय कै. अण्णासाहेब मगर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळी चिंचवड, पिंपरी, भोसरी, आकुर्डी अशा चार गावांचे मिळून त्यांनी नगरपालिकेत रूपांतर केले. नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर श्री.श्री. घारे, प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, भिकू वाघेरे पाटील (सरपंच पिंपरी गाव) तुळशीराम काळभोर (सरपंच आकुर्डी गाव) अनंतराव गावडे (सरपंच चिंचवड गाव) ज्ञानेश्वर लांडगे (सरपंच भोसरी गाव) अशी नगरपालिकेची स्थापन करण्यात आली होती. तसेच या जडणघडणीमध्ये आतापर्यंतचे सर्वच लोकनियुक्त माजी महापौर, आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी, नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचा शहराच्या विकासात मोलाचा सहभाग आहे, आणि आज नगरपालिकेची स्थापना होऊन पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष माननीय श्री. संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार स्वर्गीय आमदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास हार घालून जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्षप्रवक्ते श्री. फजल शेख, महिला अध्यक्ष नगरसेविका सौ वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका सौ. सुलक्षणा शीलवंत धर ,युवक महाराष्ट्र प्रदेशचे सचिव विशाल काळभोर, पिंपरी-चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष निखील दळवी, महिला संघटिका कविता खराडे, शिल्पा बिडकर, सविता धुमाळ, दिपाली देशमुख, मीनाक्षी उंबरकर, इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी, हि विनंती.
कळावे,
आपला स्नेहांकित
फजल शेख
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*