वैजू नंबर वन १० मार्चपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सोशल मीडियामुळे मिळाली मुख्य नायिकेची संधी


वैजू नंबर वन मालिकेतील वैजूची अनोखी कहाणी


 


स्टार प्रवाहवर १० मार्च म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या वैजू नंबर वन मालिकेची सध्या कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणाऱ्या सोनाली पंडीतची मालिकेसाठी निवड हटके पद्धतीने झालीय. त्याच निमित्ताने सोनाली पाटीलशी साधलेला हा खास संवाद.


 


वैजू नंबर वन मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?


वैजूसाठी माझी निवड होणं ही स्वप्नवत गोष्ट आहे. खरतर मी पेशाने शिक्षिका आहे. एम ए, बीएड आणि त्यानंतर एमबीए असं शिक्षण घेतल्यानंतर मी कोल्हापूरातील राजाराम ज्युनियर आणि सीनिअर कॉलेजला प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. याच आवडीमुळे सोशल मीडियावर मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे. मिनिटभराच्या व्हिडिओने जर इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटत असेल तर ते करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. याच दरम्यान वैजू नंबर वन मालिकेसाठी ऑडिशन्स सुरु होते. बऱ्याच अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. माझे व्हिडिओज पाहून मलाही ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं. इतक्या अनुभवी अभिनेत्रींमधून माझी निवड होईल असं वाटलंच नव्हतं. पण वैजू नंबर वनच्या टीमला माझ्यातली चुणुक दिसली आणि माझी निवड झाली. माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत आहे.


 


वैजू आणि सोनालीमध्ये काय साम्य आहे?


खरं सांगायचं तर वैजू आणि सोनाली वेगळ्या नाहीत. सोनालीमध्ये वैजूचे गुण आहेतच. वैजूची एनर्जी अफलातून आहे. ती सकारात्मक आहे. परिस्थीती कोणतीही असूदे त्यातून मार्ग काढण्याचं कौशल्य वैजूकडे आहे. वैजूमध्ये एक गुप्तहेर दडलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमवर तिच्याकडे हटके सॉल्यूशन आहे. वैजूच्या या लॉजिक आणि मॅजिकमुळेच तर ती नंबर वन आहे. वैजूची ही भूमिका मी २४ तास जगते आहे. त्यामुळे सोनालीला वैजूपासून वेगळं करताच येणार नाही.


 


सध्या वैजू नंबर वनच्या प्रोमोजनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. होळीच्या मुहुर्तावर मालिका भेटायला येणार आहे. मालिकेचं वेगळेपण काय सांगशिल?


रोजच्या धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. तुमच्या याच समस्येवर वैजू नंबर वन धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येणार आहे. होळीचा सण जसं संपूर्ण कुटुंब एकत्र घेऊन येतो अगदी त्याचप्रमाणे हे वैजू मालिकेतलं २२ खोल्यांचं कुटुंब तुमच्या भेटीला येणार आहे. तिसरी मंजिल चाळ नावाप्रमाणेच थोडी फिल्मी आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली मंडळी या तिसरी मंजिलमध्ये अगदी गुण्यागोविंदाने रहातात. टोलेजंग इमारतींच्या शहरात चाळसंस्कृती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चाळ हा प्रत्येकाच्या मनातला असा एक हळवा कोपरा आहे ज्याच्या आठवणी पुसणं हे केवळ अशक्य आहे. वैजू नंबर वन मालिकेतलं हे २२ खोल्यांच कुटुंब तुम्हाला नक्कीच निखळ मनोरंजन देईल. त्यासाठी पाहायला विसरु नका वैजू नंबर वन १० मार्चपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image