कर्जत आणि खालापूर मध्ये आरोग्य व्यवस्था सुधारावी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची सूचना सर्व समतोल विकास साधण्याचा प्रयत्न

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



 











 

कर्जत आणि खालापूर मध्ये आरोग्य व्यवस्था सुधारावी

जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची सूचना

सर्व समतोल विकास साधण्याचा प्रयत्न

कर्जत, दि. 3 गणेश पवार

                           आपल्याकडे जरी आरोग्य आणि शिक्षण या विभागाचे सभापती पदे असली तरी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद संबंधी जिल्ह्यातील सर्व विभागांतील कामे मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे.त्यामुळे अधिकारी वर्गाने आपण पदावर आहोत तोवर शिस्तीने काम करायला हवे अशी सूचना करतानाच चुकीची कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा कडक शब्दात तंबी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या आढावा बैठकीत दिली.

                                रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत आणि खालापूर तालुका पंचायत समितीच्या सर्व विभागांची आढावा बैठक कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले,सीमा पेमारे,कर्जत पंचायत समितीचे सदस्य काशीनाथ मिरकुटे,माजी सभापती तानाजी चव्हाण, कर्जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षाचे नेते शरद लाड यांच्यासह कर्जत पंचायत समिती चे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी,खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये,अतिरिक्त गटविकास अधिकारी तेली, राजपूत आदीं व्यासपीठावर उपस्थित होते तर या आढावा बैठकीला कर्जत आणि खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.सुरुवातीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे हस्ते जनार्दन पमचंद या अपंग कर्मचारी यांचा त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान करण्यात आला.आढावा बैठकीसाठी शिक्षण,आरोग्य, बांधकाम,महिला बालकल्याण, सांख्यिकी,पशु संवर्धन, पंचायत समिती शिक्षण विभाग,लघु पाटबंधारे, या विभागांचा आढावा घेण्यात आला.

                                    सुरुवातीला आढावा सादर करण्यासाठी आलेले बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद गोपणे यांनी आढावा सादर करताना तो मोघमपणे देण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी त्यांच्याकडून देण्यात येणारा आढावा हा त्यांनी सभेसाठी दिलेल्या टिप्पणी मध्ये असलेली चुकीची आकडेवारी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा नवीन टिपणी तयार करून आढावा देण्याची सूचना केली.त्यानंतर आढावा देत असताना कर्जत पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी कामे वाचून दाखवली.त्यावेळी कर्जत पंचायत समितीच्या सेस निधी मधून जी कामे केली जात आहेत,त्यात सदस्यांचा सेस निधी असताना कामे निधी नाहीत म्हणून का अर्धवट राहिली आहेत?याची चौकशी करण्याची सूचना दिली.त्याचवेळी कोंडीवडे ग्रामपंचायत मध्ये दीड लाख खर्चून एक रस्ता बनविला असून त्या रस्त्याच्या कामासाठी कोणाची शिफारस होती?असा प्रश्न जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी उपस्थित करून गावात अनेक रस्त्यांची कामे शिल्लक असताना फार्म हाऊस साठी रस्ता करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ते दीड लाख जमा करून घेतले जावेत असे गटविकास अधिकारी यांना सूचित केले.बचत गटांचे काम करणाऱ्या सर्व बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील बचत गटांना उत्पादित केलेल्या वस्तू चे प्रदर्शन मांडणारा मेळावा आयोजित करावा असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सूचित केले असून नवीन बचत गटांना त्या माध्यमातून चालना दिली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला

                           रायगड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष बरोबर आरोग्य आणि शिक्षण समिती चे सभापती असलेले सुधाकर घारे हे या दोन्ही विभागांचा आढावा सादर होत असताना आक्रमक झाले.खालापूर तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात फार कमी रुग्णांवर उपचार होतो असा दावा करून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले फार्मासिस्ट हे औषध यांची मागणी करीत नसल्याचा आरोप केला.त्यानंतर आपल्याकडे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी किती औषधे नेली आहेत याची माहिती दिल्यानंतर सर्व आवक झाले.कारण जिल्हा परिषदेत 189 प्रकारची औषधे उपलब्ध असताना सर्व आरोग्य केंद्र औषधे आणण्यासाठी जात नाहीत,आणि त्यामुळे रुग्णलायत रुग्ण यरत नाहीत.यास जबाबदार असलेल्या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश उपाध्यक्ष घारे यांनी दिले.चौक येथील फार्मसी चे कर्मचारी वर्षातून केवळ चार औषधे घेऊन गेले असून वावोशी, खालापूर, लोहोप मध्ये काही वेगळी स्थिती नाही असे सांगून तेथे ओपीडी कमी झाली असून रुग्ण जात नाहीत ही बाब लक्षात घेऊन त्या सर्वांची तात्काळ चौकशी व्हावी असे आदेश उपाध्यक्ष घारे यांनी दिले आहेत.शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात जिल्हा बदली झालेले शिक्षक हजर झाले नाहीत,त्यांना शेवटची सूचना देण्याचे आदेश देखील उपाध्यक्ष घारे यांनी दिले असून कोणत्याही ठिकाणी शाळेच्या इमारती नादुरुस्त आहेत,त्या बाबत सत्य अहवाल देण्याचे आदेश दिले असून त्या सर्व ठिकाणी आवश्यकते नुसार इमारती मंजूर केल्या जातील असे आश्वासन दिले.

                               कर्जत तालुक्यातील अंगणवाडी च्या 25 ठिकाणी इमारती नाहीत,त्या ठिकाणी इमारती व्हाव्यात यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.तर अमृत आहार चा आहार गेली दोन महिने का मिळत नाही?याची विचारणा आपण रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलून त्याचे स्पष्टीकरण करून घेऊ असे सांगून खालापूर तालुक्यातील महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी कुपोषित बालकांची माहिती दडवून ठेवत असल्याचे समोर आल्याने त्या अधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुधारित आणि खरी माहिती गोळा करून आणण्याचे आदेश दिले.जे अधिकारी गैरहजर आहेत,त्यांची माहिती मागवून घेऊन त्यांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील दोन्ही गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या.यावेळी उपाध्यक्ष घारे यांनी दोन्ही तालुके पाणीटंचाई मुक्त आहेत काय?असा प्रश्न करून पाणी टंचाई कमी करण्यासाठी आपण मागील वर्षभर खर्च करून देखील त्यात सुधारणा होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.त्याचवेळी ममदपूर येथील नळपाणी योजनेचे काम पूर्ण झाले नाही.त्यामुळे ठेकेदाराला सूचना द्या आणि त्यांनी ऐकले नाही तर नवीन ठेकेदार नेमा असे आदेश या बैठकीत देण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

फोटो ओळ 

आढावा बैठक

छायः गणेश पवार









 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*