*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
पुढील ७ आठवडे भारतासाठी धोक्याची घंटा; अभ्यास अहवालात खळबळजनक माहिती
_________________________
__________
सध्या कोरोनामुळे जगभरातील देशांना संकटाचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सर्व देश कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच एक अभ्यास अहवाल समोर आला आहे. ज्यात भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. जर भारतातील लोकांनी आता काळजी नाही घेतली तर कोरोनाचे भयंकर स्वरुप येणाऱ्या काळात पाहायला मिळतील.
हा अभ्यास अहवाल COV-IND 19 गटाने केला आहे. या गटाने चीन, अमेरिका, इटली आणि अन्य देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव कसा झाला याचा अभ्यास करत भारतातील आकडेवारीचे अकलन करत आहेत. भविष्यात कोरोनाचं स्वरुप कसं असेल याचीही माहिती घेतली जात आहे.
मिशिगन यूनिवर्सिटी, जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटी, कनेक्टिक्ट यूनिवर्सिटी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या बायो आणि डेटा सायंटिस्टने सांगितले की, मे महिन्यात कोरोना व्हायरसाचा प्रार्दुभाव आणखी वाढेल. कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ६० हजार ते जास्तीत जास्त ९.१५ लाखांपर्यंत पोहचू शकते.
अभ्यास अहवालानुसार, पुढील काही महिने भारतात स्थिती आणखी बिकट होणार आहे. ३१ मार्चपर्यंत कोरोना व्हायरसची संख्या ३७९ होईल असं सांगितलं होतं मात्र सध्या २४ मार्च रोजी भारतात जवळपास ५०० कोरोना रुग्ण आढळून आलेत. हा आकडा किती वाढेल याचा अंदाज नाही.
१५ एप्रिलपर्यंत कोरोना पीडितांची संख्या ५ हजारांपर्यंत जाईल. तर मे महिन्यात १५ तारखेपर्यत कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ हजार ६४३ पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली आहे.
हा आकडा कमी स्तरावर कोरोना पसरला तर असू शकतो. पण कोरोनाचा संसर्ग वाढला तर १५ मे पर्यंत याची संख्या ९ लाखांच्या वर पोहचू शकते.
COV-IND 19 अभ्यास गटाच्या मते, १९ मार्चपर्यंत भारत अमेरिकन पॅटर्नचा अवलंब करत होता. म्हणजे भारतात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी अमेरिका आणि इटलीच्या खूप कमी आहे.
हा विषाणू भारतासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होईल कारण देशात रुग्णालये कमी आहेत. जागतिक बँकेच्या मते, भारतात १००० लोकांच्या मागे ०.७ रुग्णालये आहेत. तर फ्रान्समध्ये ६.५, दक्षिण कोरियामध्ये ११.५, चीनमध्ये ४.२, इटलीमध्ये ३.२, यूकेमध्ये २.९ आणि अमेरिकेत २.८ रुग्णालये आहेत.
उन्हाळ्यात भारतातील कोरोना विषाणूचा परिणाम अधिक भयानक असू शकतो. या अभ्यास गटाच्या मते, उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा नाश होईल हे सांगणे कठीण होईल. कदाचित हा व्हायरस भयावह स्वरूप देखील घेऊ शकतो.
पूर्णपणे वाहतूक आणि प्रवास बंद केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाईल. यामुळे, विषाणूचा प्रसार थांबविला जाऊ शकतो परंतु तो पूर्णपणे संपणार नाही. प्रवासावरील बंदी काढताच कोरोना पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा हवामान किंवा तापमानाशी काही संबंध नाही
तसेच भारतात या विषाणूमुळे पीडित लोकांच्या अचूक संख्येविषयी माहिती नसल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. हे कोणीही नाकारू शकत नाही असंही अभ्यास अहवालात म्हटलं आहे.
कोरोना वायरस
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक परेशान झाले आहेत. सरकारही आपल्या पद्धतीने या व्हायरससोबत लढण्याचे प्रयत्न करत आहे. मदतीसाठी आता अनेक श्रीमंत सेलिब्रिटी आणि अनेक संस्था समोर आल्या आहेत. कोरोनासोबत लढण्यासाठी यांनी कोट्यवधी रूपये दान दिले आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*