जागतिक महिला दिनानिमित्त चिखली मध्ये माजी महापौर राहुल दादा जाधव यांच्यावतीने महिला भगिनीसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जागतिक महिला दिनानिमित्त चिखली मध्ये माजी महापौर राहुल दादा जाधव यांच्यावतीने महिला भगिनीसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन


जागतिक महिला दिना निमित्त मा.महापौर राहुलदादा जाधव यांच्या वतीने खास महिला भगिनी साठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिला भगिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मा. महापौर राहुलदादा जाधव यांच्यावतीने महिला भगिनीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली तसेच प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस एलसीडी फ्रिज वॉशिंग मशीन सोन्याची नथ व मानाची पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की प्रत्येक महिले मध्ये ज्याप्रमाणे एका आई एक बहीण एक पत्नी असते त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांमध्ये एक कलाकार पण दडलेला असतो म्हणूनच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी तसेच इतर महिलांमध्ये जागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सर्व महिला भगिनीसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था राहुल जाधव स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती यावेळी माजी महापौर राहुल जाधव भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांच्या सुकन्या साक्षी महेशदादा लांडगे दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगलताई राहुल जाधव सौ प्रीती बोंडे संगीता भोसले सौ सोनमताई रवींद्र जांभुळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घारे रवी जांभुळकर महेंद्र मंडलिक प्रताप भांबे रवी आण्णा भुजबळ इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*