फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त लालमहाल, पुणे.येथून एक भव्य चित्ररथाची मिरवणूक निघाली होती ( हा लेख जरूर वाचा आणि संबंधितास् मदतीचा हात पुढे करा)

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


दि.१९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त लालमहाल, पुणे.येथून एक भव्य चित्ररथाची मिरवणूक निघाली होती.त्या मिरवणुकी मध्ये काही फोटो काढण्यासाठी मी गेलो असताना एका शिवचित्र रथाच्या मागे असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरील श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरने माझे लक्ष्य वेधून घेतले म्हणून मी जवळ जाऊन बघितले असता त्या चित्रातील श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी चेहरा व बसण्याचा रुबाब या मूळे ते चित्र फारच सुदंर दिसत होते व ते विक्रीसाठी ठेवलेले आहे.
ते विकण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तीला पोस्टरची किंमत विचारली असता  मला त्यांनी ती रु.५० सांगितली.त्यांच्या कडून मी एक पोस्टर विकत घेतले आणि माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे बाजूला उभे राहून त्या चित्रविक्रत्याचे निरीक्षण करत उभा राहिलो. थोडावेळ निरीक्षण केल्यानंतर त्याच्या देहबोलीवरून माझ्या लक्षात आले ते सराईत विक्रते नाही मग मी त्यांची चौकशी करावी म्हणून त्यांच्या जवळ जाऊन बोलण्यासाठी सुरवात करताना माझे नाव व माझ्या फोटोग्राफीच्या व्यवसाया बद्दल सांगितले व त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सदानंद धनवडे सांगितले तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या पोस्टरवर तेच नाव होते म्हणजे त्या चित्राचे चित्रकार ते स्वतःच होते.
त्यांच्या कडून पोस्टर विकत घेणाऱ्या लोकांना कल्पना नव्हती की आपण विकत घेत असणाऱ्या पोस्टरच्या चित्रकारकडूनच आपण ते विकत घेत आहोत.
त्या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले माझे नाव महत्वाचे नाही तर माझे चित्र अनेक शिवप्रेमी लोकांच्या घरी जात आहे याचे समाधान आहे,म्हणून चित्राच्या छपाई व कागदाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता ह्या पोस्टरची किंमत कमीत कमी ठेवण्याचा मी प्रयन्त केला आहे.
स्वतःच पोस्टर विकण्याचे कारण पोस्टर विकत घेतल्या नंतर लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघणे ही माझ्या चित्रकलेला मिळणारी फार मोठी दाद आहे असे मी समजतो.
या नंतर त्यांचा एक फोटो काढू का ?असे मी विचारले असता त्यांनी नम्रपणे नकार दिला व ते म्हणाले आपण माझा फोटो न काढता श्री .छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढावा.
वरील फोटो त्याच पोस्टरचा आहे,
आपणांस त्या चित्राची व त्या शिवप्रेमी चित्रकाराची माहिती व्हावी म्हणून हे लेखन!
सुहास गणबोटे
(फोटोग्राफर)
चित्रकार सदानंद धनवडे.कोथरूड, पुणे.
९८२२०३५३११


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*