पुणे महापालिकेचे आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी नागरिकांशी साधला खुला संवाद,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
महापालिका आयुक्तांचा नागरिकांशी खुला संवाद,
पुणे महापालिकेचे आयुक्त मा,शेखर गायकवाड यांनी आज कार्यालयीन वेळातील नागरिकांचे भेटीच्या  दुपारी ३ ते ५,या वेळात मनपाच्या नवीन विस्तारित इमारतीमधील तळमजला येथे  नागरिकांशी संवाद साधला,
उपस्थित नागरिकांनी याप्रसंगी  मा,मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांचेशी सम्पर्क साधून निवेदने सादर केली,
विविध विभागांशी संबंधित सुमारे २७,निवेदने प्राप्त झाली,
प्रत्येक निवेदन सादर करणाऱ्या व्यक्तींशी मनपा आयुक्तांनी सविस्तर चर्चा केली,निवेदनांवर कार्यवाही करण्याचे दृष्टीने सदरचे निवेदने संबंधित खात्याकडे पाठविण्यात येणार आहेत,
या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले,
सदरचा उपक्रम दर सोमवार व शुक्रवार दुपारी ३ ते ५,या वेळात पुढील काळात आयोजित केला जाईल,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
०६/०३/२०२०,