पुण्यात 'मास्क' विक्रीत व्यापाऱ्यांकडून पुणेकरांची लूट..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुण्यात 'मास्क' विक्रीत व्यापाऱ्यांकडून पुणेकरांची लूट...!*


*करोना* सारख्या भयानक आजारामुळे सध्या पुण्यासह महाराष्ट्रात आणि जगभर थैमान घातलेले आहे. भयानक संसर्गजन्य व्हायरस असल्यामुळे भीतीचे वातावरण असले तरी 'पुणेकर' नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. नागरिकांनी हाताची स्वच्छता वेळोवेळी करावी, तोंडाला मास्क लावावे,  किंवा गर्दीमध्ये जाणे टाळावे. गर्दीत न गेल्यास कुठलाही संसर्ग होणार नाही. मात्र पुण्यात व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने मास्क विक्री करत असल्यामुळे नागरिकांची पिळवणूक होत आहे. महानगरपालिकेने सुद्धा महापालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात कमी व माफक दरात 'मास्क' वितरीत करण्याची व्यवस्था करावी. कारण पुणेकर नागरिक जनता प्रचंड घाबरलेली आहे.


*पुण्यामध्ये व्यापार्‍यांकडून मास्क विक्री जास्त दराने केली जात आहे.* चार पट दराने मास्क विक्री होत असल्यामुळे घाबरलेल्या नागरिकांची पिळवणूक होत आहे. *पुणे महानगरपालिका आयुक्त व पुणे जिल्हाधिकारी* यांनी सर्व प्रश्न प्रशासनाला शक्तीचे आदेश देऊन व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवावे. *'जो व्यापारी मूळ किमतीपेक्षा जास्त दराने 'मास्क' विक्री करत असेल तर त्याचा परवाना रद्द करावा...'* कारण व्हायरस ची लागण एका व्यक्तीकडून सर्व कुटुंबाला होत असल्यामुळे पुणेकर नागरिक घाबरून गेलेला आहे. खूप लोकांच्या 'संभाजी ब्रिगेड' कडे तक्रारी येत आहेत. विनाकारण व्यापाऱ्यांनी लोकांची लूट थांबून पिळवणूक करू नये. 


पुण्यामध्ये जो मास्क विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून जास्त दराने मास्क विक्री केली जात असेल तर संभाजी ब्रिगेड कडे संपर्क करावा... तक्रार करावी. जेणेकरून त्या दुकानदारांना चांगल्या पद्धतीने समज देता येईल.


*व्यापाऱ्यांच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त दरवाढी विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त व अन्न व प्रशासन विभाग* यांच्याकडे व्यापाऱ्यांनी विरोधात तक्रार करणार आहोत. मास्क महाग विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे.


*नागरिकांनी 'करोना' व्हायरसने घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी.*


लोकांच्या संपर्कासाठी...


संतोष शिंदे    - ९८५०८४२७०३
प्रशांत धुमाळ - ९८८१४०२२४१
महादेव मातेरे - ७८७५८१९८८९
गणेश चऱ्हाटे  - ९८८१६६२१२१
राहूल टेंगळे    - ९०७५५८५६९६
संदिप लहाने   - ९८२३२१३१७७


  - संतोष शिंदे,
*- संभाजी ब्रिगेड, पुणे.🚩*