पुणे प्रवाह न्युज पोर्टल
औरंगाबाद येथे दलित बांधवांवर महिन्याभरात झालेल्या
पाच हत्याकांडाचा दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने जाहीर निषेध
औरंगाबाद येथे दलित बांधवांवर महिन्याभरात झालेल्या पाच हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेशाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देउन निषेध नोंदविण्यात आला . राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष व युवक अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केली आहे .
एका दलित तरुणाने माळी समाजातील तरुणीशी प्रेम केले म्हणून हे हत्याकांड घडले आहे . पुरोगामी महाराष्ट्रात दलितांबद्दल अशी भावना ठेवून वागणूक दिली जात आहे . या हत्याकांडामधील सर्व आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे . या हत्याकांडामधील आणखीन आरोपीना अटक झाली पाहिजे .
भीमराज गायकवाड कुटुंबियांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा दलित पॅंथरतर्फे महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष व युवक अध्यक्ष यशवंत नडगम यांनी दिला आहे .
यावेळी दलित पॅंथरच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सोनाली नवदुग व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .