आळंदी इंद्रायणी घाटावरील गरिबांना अन्नाचे वाटप  नगरसेवक सचिन गिलबिले यांच्याकडून माणुसकीचे दर्शन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आळंदी इंद्रायणी घाटावरील गरिबांना अन्नाचे वाटप 
नगरसेवक सचिन गिलबिले यांच्याकडून माणुसकीचे दर्शन
आळंदी देवाची : दिनेश कुऱ्हाडे 
ज्याची नघडे काशी त्याने यावे आळंदी पाशी या उक्तीप्रमाणे आळंदीत आलेला कोणताही माणुस जो उपाशी राहत नाही परंतु कोरनो रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या संचार बंदीमुळे आळंदीतील बहुतेक हॉटेल बंद,आळंदी शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे अन्नदान, जलराम मंदिराचे अन्नदान सेवा, गजानन महाराज संस्थांनचे अन्नदान हे बंद असल्यामुळे गेली अनेक वर्षे आळंदी येथे घरच्यांनी सोडून दिलेले ज्येष्ठ नागरिक,अपंग, भिक्षेकरू, हातावर पोट असलेले काही मजूर बांधवांना अन्न मिळणे अवघड झाल्याने अशा नागरिकांच्या गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी आळंदीतील नगरसेवक सचिन गिलबिले यांच्या पुढाकाराने इंद्रायणी घाटावरील नागरिकांना जेवण्याची सोय करण्यात आली असून आपण या समाजात राहतो आणि या समाजाचं आपण काही तरी देणं लागतो.असा संदेश अलंकापुरी helping hand द्वारे देण्यात आला.जगभरात परिस्थिती पाहता कोरोणा कोविड 19 महामारी ने संपूर्ण जगाला झपाट्याने विळख्यात घेत आहे . 
 बेघर, हातावर पोट भरत असलेली लोक आणि भिक्षा मागून उधरणीर्वाह करणारी लोकं गेली तीन दिवसांपासून उपासमारीची आणि हलाकीच्या परिस्थितीला सामोरे जात आहे .
अन्न व काही खाण्यास मिळणे ही अवघड झाले असता यांना अन्न पुरवण्यात आले आहे यावेळी जनार्धन आहेर, विशाल टोकेकर, सुनिल लवटे, रवी वैरागे, विजय वैरागे,संदीप नरवटे,ज्योती आहेर यांचे मोठे योगदान लाभले. तसेच  यासाठी आळंदीचे नगरसेवक सचिन गिलबिले यांच्या साहाय्याने हा उपक्रम चालू केला आहे तरी सर्व नागरिकांना आणि सर्व मदतगार लोकांना अहवान करतो की यांसाठी मदतीचा हात पुढे करावा .अन्न नाही देवू शकत तर पाणी द्या, कोणतेही खाद्यदार्थ द्या, किंवा आपल्या परिसरातील मदत करणाऱ्यांना अर्थसाह्य करा.कारण की मंदिरात देवाला नतमस्तक झाल्यावर मिळणाऱ्या आशीर्वाद पेक्षा जास्त गरिबाचे गरजू लोकांचे आशीर्वाद गुणकारी ठरतात असे आवाहन नगरसेवक सचिन गिलबिले यांनी केले आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*