कलोत्सव २०२०' चे शानदार उदघाट्न* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*'कलोत्सव २०२०' चे शानदार उदघाट्न*
------------------
*इनामदार कॉलेज मध्ये चित्रकला,ग्राफिक्स,ऍनिमेशन कलांचे प्रदर्शन*  


पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट,ड्रॉईंग अँड ऍनिमेशन'(वेदा) आयोजित 'कलोत्सव २०२०' या  चित्रकला,ग्राफिक्स ,डिझाईन,ऍनिमेशन कला महोत्सवाचे उदघाटन 'स्वतंत्र थिएटर' च्या सहसंस्थापक धनश्री हेबळीकर,युवा कलाकार आदित्य बीडकर आणि 'प्रबोधन माध्यम'चे संचालक दीपक बीडकर यांच्याहस्ते ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता झाले .आझम कॅम्पस मध्ये हा एक दिवसीय कलोत्सव पार पडला.शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी भेट देवून प्रदर्शनातील कलाकृतींची पाहणी केली.  


  'पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट,ड्रॉईंग अँड ऍनिमेशन' च्या संयोजन समितीच्या वतीने प्राचार्य डॉ.ऋषी आचार्य,स्वतंत्र जैन,ताहेर खान यांनी स्वागत केले.उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सहसचिव इरफान शेख,मुमताज सय्यद इत्यादी उपस्थित होते.    


या एकदिवसीय महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले.चित्रकला,ग्राफिक्स,शिल्पाकृती,२-डी,३-डी ऍनिमेशन कलांचा या  प्रदर्शनात समावेश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ६ निवडक ऍनिमेशन शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाला आशिष कुलकर्णी,करिष्मा वाबळे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 


................................................