आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तंबाखु, सिगारेट,बिडी, गोवा-गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.   पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


दिनांक ०९/०३/२०२० 
कृपया प्रसिध्दीसाठी
प्रति, 
    मा. संपादक,
    दैनिक........
महोदय,
 आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तंबाखु, सिगारेट,बिडी, गोवा-गुटखा, पानमसाला यांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
  पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी अजंठानगर येथे दुपारी ०२:०० वाजता शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कु.वर्षा जगताप, सौ. गंगा धेंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली. होती. 
 याबाबत बोलताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, आजचा तरुण व्यसन करून दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात व त्यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना त्यामुळे अनेकांना सामोरे जावे लागते, श्वसनाचा त्रास, फुफ्फूसाचा विकार, मेंदूवरील संतोलन जाणे, असे अनेक रोग होण्याची शक्यता आसते, त्यामुळे आजची काही तरूण पिढी ही भविष्याचा कोणताही विचार न करता व्यसनाला महत्व देत आहे, ही गंभीरबाब आहे हे नाकारता येत नाही. तसेच वर्षा जगताप म्हणाल्या कि, आजच्या तरुण पिढीमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात लक्ष न देता व्यसनाधीन होऊन अभ्यासापासून वंचित राहतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुटक्याची होळी करुन प्रबोधनाचा संदेश देत आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. 
 यावेळी पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता ताठे, ऋतुजा बिराजदार, श्वेता पाटे, शलाका बनगर, हिना आत्तार, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, प्रदीप गायकवाड, रशिद सय्यद, रविराज साबळे, राहुल चौधरी, नवनाथ साबळे, रुपेश धेंडे, राहुल साखळे, पल्लवी साखळे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी ही विनंती.
कळावे,
आपले स्नेहांकित,
                                                        
    सौ. गंगाताई धेंडे               कु. वर्षाताई सर्जेराव जगताप
सा.न्या.वि. महिला अध्यक्षा          युवती अध्यक्षा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*