संभाजी ब्रिगेडच्या वतीने ......जेवण पुरवण्यासाठी 'पास' द्यावा...!!*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जेवण पुरवण्यासाठी 'पास' द्यावा...!!*


संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही विद्यार्थ्यांना 'मोफत जेवण' देण्याची व्यवस्था केली आहे. पुण्यात बऱ्याच लोकांना दोन दिवसापासून अन्नही मिळालेलं नाही. अशांना जेवण देण्याचा प्रयत्न आमच्या संभाजी ब्रिगेड पुणे टीमच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु सध्या *पुण्यात संचारबंदी* लागू असल्यामुळे आणि संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे गाडीवर प्रवास करणे शक्य नाही. म्हणून *मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. जिल्हाधिकारी व पुणे पोलीस आयुक्त* यांना विनंती आहे की, की विशेष अत्यावश्यक सेवा म्हणून संभाजी ब्रिगेडच्या पाच कार्यकर्त्यांना जेवणाचे डबे पुरवण्यात परवानगी द्यावी. त्यासाठी रस्त्यावर फिरण्यास 'पास' द्यावा ही नम्र विनंती आहे.


पुणे पोलिस व राज्य सरकार यांना ट्विटर (Twiter) द्वारे लेखी पत्र पाठवून विनंती केली आहे.  जेवणाच्या डब्यात व्यतिरिक्त एकही आमचा कार्यकर्ता रस्त्यावर फिरणार नाही. *'मास्क' व 'हॅन्ड ग्लोज'* वापरून तो स्वतःची १००% काळजी घेऊन शक्य होईल तेवढ्या पुण्यातील उपाशी व गरजवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी व लोकांना जेवणाचे डबे मोफत पुरवण्याची ची परवानगी मिळावी ही विनंती व अपेक्षा आहे.


संपूर्ण शहर बंद असल्यामुळे लोकांचे अर्थात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून त्यांना दोन दिवसापासून जेवण मिळत नाही यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना विनंती करण्यात येत आहे.


- संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड, पुणे.