भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे  *बोल नुपुरांचे व अंक गणिताचे*  कार्यक्रमाचे आयोजन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


प्रेस नोट


*भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे 
*बोल नुपुरांचे व अंक गणिताचे*  कार्यक्रमाचे आयोजन*
.............................................



पुणे :


भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 
'बोल नुपुरांचे व अंक गणिताचे ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ' नृत्यवेध ' कथक नृत्य संस्था  प्रस्तुत हा कार्यक्रम शनीवार, ७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. भारतीय विद्या भवन चे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


नृत्य वेध ' च्या संस्थापिका डॉ. माधुरी आपटे, आणि त्यांच्या ४० विद्यार्थिनी  हा कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत. गणित या अवघड वाटणाऱ्या विषयाची गुंफण नृत्यकलेशी करून मनोरंजनात्मक पध्दतीने रसिकांसमोर सादर करणार आहेत.



     कथकनृत्यातील गिनती या प्रकारात 1 ते 9 हे अंक विशिष्ट चढत्या उतरत्या क्रमाने म्हणताना
त्यास पायातील नुपुरध्वनींची साथ मिळते. याच कल्पनेतून डाॅ. माधुरी आपटे यांनी संपूर्ण गणितावर आधारित कथकनृत्य सादरीकरणाचे शिवधनुष्य
पेलण्याचा प्रयत्न केला आहे. 
     गणितप्रेमी श्री विलास पोतनीस यांच्या स्वरचित
गणिती कवितांचे सादरीकरण नृत्यकलेशी जोड देऊन होणार आहे. या सर्व कवितांना संगीतबद्ध केले आहे श्री. अजय पराड यांनी. 
      गणिती फटका, अंकांचे सौंदर्य दाखवणारे गणपती बाप्पा, गणितदेवाची आरती, आयुष्य हेच
गणित आणि एवढेच कशाला तर प्रेम म्हणजे गणितच असतं हे सिद्ध करणा-या कविता रसिकांसमोर नृत्यमाध्यमातून सादर होणार आहेत.



सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत सादर होणारा हा १०२ वा कार्यक्रम आहे.


................................................


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*