राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी विभाग व पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने  ५०० नागरिकांनी घेतला लाभ मोफत आरोग्य शिबीर संपन्न

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी विभाग व पुणे मनपाच्या


आरोग्य विभागाच्या सहकार्याने  ५०० नागरिकांनी


घेतला लाभ मोफत आरोग्य शिबीर संपन्न


राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी विभाग व पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीर वडगावशेरी व विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडले . या शिबिरात जनरल तपासणी,दातांची तपासणी,ब्लडप्रेशर,शुगर महिलांची व मुलांची विशेष तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.यामध्ये अनेकांनी तपासणी करून घेतली.शिबिरात आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष रेणुका चलवादी यांनी यशस्वीरीत्या केले. या आरोग्य शिबिराचा  ५०० नागरिकांनी लाभ घेतला .


       शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी वडगाव शेरी विभागाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे,राष्ट्रवादीच्या युवती  अध्यक्षा  अश्विनी परेरा,माजी नगरसेवक हुलगेश चलवादी,नारायण गलांडे,उषाताई कळमकर,शितल टिंगरे,निता गलांडे आदीं उपस्थित होते . सर्वाचे स्वागत महात्मा फुले पगडी,शाल,श्रीफळ देऊन करण्यात आले यावेळी उपस्थित डॉक्टर व स्टाफचा सत्कार गुरू चलवादी व आकाश चलवादी यांच्या हस्ते करण्यात आला.


राजीव गांधी रुग्णालय व कमला नेहरू रुग्णालय यामधील वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . डॉ पी के भिमानी , बाल रोग तज्ञ् डॉ स्वाती पाटील , डॉ अभय गर्ग , डॉ मयूर आगरवाल , डॉ सचिन नाड , डॉ प्रणाली सातपुते , डॉ स्मृती खैरे आदींनी  विशेष सहकार्य केले .