१८ मार्चला होणारा कलासंस्कृती परिवाराचा 'स्टार्स ऑफ स्क्रिन अवॉर्ड' सोहळा लांबणीवर!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


१८ मार्चला होणारा कलासंस्कृती परिवाराचा 'स्टार्स ऑफ स्क्रिन अवॉर्ड' सोहळा लांबणीवर!

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय - मेघराज राजेभोसले

 

पुणे : कला संस्कृती परिवारातर्फे घेण्यात आलेला ‘पडद्यामागील कलाकारांचा’ पुरस्कार वितरण सोहळा दि. १८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. पण सध्या उद्भवलेल्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे हा कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे.    

मा.मुख्यमंत्री साहेबांनी विशेष आदेशानुसार  पुणे, मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड अशा शहरांमधील सर्व चित्रपट व नाट्य ग्रुहे 'कोरोना' साथ प्रतिबंधीत करण्यासाठी बेमुदत बंद केलेले आहेत. त्यामुळे कलासंस्कृती परिवाराचा दि.१८/३/२०२० रोजी होणारा 'स्टार्स आँफस्क्रिन अवाँर्डस् सोहळा' हा पुढे ढकलण्यात आला आहे.  नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानेही केलेले आहे.अशी माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष व कला संस्कृती परिवाराचे सल्लागार मेघराज राजेभोसले यांनी दिली.

 

या कार्यक्रमासंदर्भातील पुढील तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्व रसिकांनी नोंद घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी कला-संस्कृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी, कार्याध्यक्ष गिरीश कोळपकर, सचिव विनय जवळगिकर, खजिनदार प्रवीण वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.