वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे                                                                    -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे
                                                                   -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
  पुणे दि.19 :- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या. 
  राज्यामध्ये  आठ ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी पुणे येथील बी.जे.मेडीकल कॉलेज मधील लॅबच्या तयारीचा आढावा  विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी  बी.जे.मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता अजय चंदनवाले तसेच  वैद्यकीय पथकातील लॅब प्रमुख डॉ. सुवर्णा जोशी, डॉ.राजेश कार्यकर्ते, डॉ. सांगळे, डॉ. गोडसे, डॉ. हरीश टाटीया व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी विभागीय आयुक्त् डॉ.म्हैसेकर यांनी या लॅबकरीता आावश्यक साधनसाम्रगी उपलब्ध  करुन देण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार अतांत्रीक मनुष्यबळ देखील उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून याकरीता आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले. त्याचप्रमाणे संसाधने उपलबध करुन देण्यात कोणतीही कमतरता रहाणार नाही असे सांगून  उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विमा  व इतर सोयीसुविधांचा आढावा घेतला.
 ससून हॉस्पीटल येथील नव्याने सुरु करण्यात येणा-या इमारतीमध्ये आयसोलेशन कक्षांची निर्मिती  करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व पुरविण्यात येणा-या सोईसुविधांचा देखील आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग,उप अभियंता अनुराधा भंडारे, शाखा अभियंता देविदास मुळे तसेच विद्युत विभागाच्या उप अभियंता अनघा पुराणिक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००