पुरस्कार जाहीर करताना जातीचं जातिने भेदभाव करणाऱ्यावर कठोर कारवाई होणेबाबत.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रति,
मा. आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका
पुणे.


विषय : पुरस्कार जाहीर करताना जातीचं जातिने भेदभाव करणाऱ्यावर कठोर कारवाई होणेबाबत.


मा. आयुक्त साहेब,
         आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, सुमारे दोन महिने अगोदर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांनी मेहतर शब्दच उल्लेख पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात येत असल्यास असे निर्देश आल्यामुळे आपणास नोटीस बजावून संबंधित निष्काळजी अधिकारी वरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते तसेच वारंवार मेहतर ह्या शब्दाचा पुणे महानगरपालिका वापर करत आहे आम्ही पुन्हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ला सदर झालेली घटनेचे तपशील आढाव देऊन संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची साठी विनंती करणार आहेत ।
         आजच्या जगात कायदा-सुव्यवस्था एवढी सुंदर असताना देखील पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मेहतर जातीचं वर्णन करत आहे । सदर कृती मुळेे सर्वे सफाई कर्मचारी आणि वाल्मिकी समाजाचा अपमान झालेलं आहे हे बाब नाकारता येणार नाही । मेहतर हे कोणत्याही महानगरपालिकेचे पद नसून हे एक समाजाची जातीचे वर्णन आहे | वारंवार पुणे महानगरपालिकेला विनंती करून देखील अधिकारी मार्फत कायद्याचं उल्लंघन होत आहे ।
         सबब सदर झाले घटनेची तपशील माहिती घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत व प्रचलित कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती |



आपला
दीपक नीनारिया
सदस्य : पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी समन्वय समिती