महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज  को. ऑप.क्रेडिट सोसायटी ली.पुणे ने साजरा केला महिला दिन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज  को. ऑप.क्रेडिट सोसायटी ली.पुणे ने साजरा केला महिला दिन


बँक ऑफ महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज  को. ऑप. क्रेडिट सोसायटी ली.पुणेने मोठ्या उत्साहात साजरा केला महिला दिन. पुणे स्थित  महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज को. ऑप.क्रेडिट सोसायटी ली.चे बँक ऑफ महाराष्ट्रच्या भारत भरातील सर्व शाखांमध्ये सभासद असुन सोसायटीचा कार्यभार बँकेच्या भारत भरातील  शाखांमधून चालतो. सोसायटीची  नियमित मासिक सभा आयोजित करण्यात येते. या मासिक सभेच्या अनुषंगाने  येणारे सर्व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन  सोसायटीतर्फे मोठ्या उत्साहात  पार पाडण्यात येत असतात. मार्च महिन्याची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली असून त्या सभेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला


या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष, मा. अरविंद मोरे, उपाध्यक्ष, मा. शिवाजीराव डिंबळे, सचिव, मा. प्रकाश कदम, तज्ञ संचालक, मा. प्रकाश पवार, संचालक, मा. विलास कथुरे, प्रशांत कुलकर्णी, अमृत राठोड, सौ. पूजा हवा, मोहिनी नलावडे, मॅनेजर, मंदार पवार वरिष्ठ मॅनेजर मा. कोकाटे जी उपस्थित होते


या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष मा. अरविंद मोरे यांच्या शुभहस्ते सोसायटीच्या महिला संचालक मा. पूजा हवा मोहिनी नलावडे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष मा. अरविंद मोरे यांनी मार्चला महिला दिन का साजरा करण्यात येतो या बद्दल सविस्तर माहिती दिलीश्री अरविंद मोरे यांनी महिलांना अधिकार संधी देण्याचे काम आपल्या भारत देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा महिलांसाठी मोलाचे कार्य केले असे सांगितले.   महिलांचे बलिदान, समर्पण, प्रेम अतोनात कष्टामुळे कुटुंब, समाज देश प्रगती करत आहे हे सुद्धा  सांगितले महिलांनी सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तर केली आहेच सोबतच  बँकिंग सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात सुद्धा महिला  काम करीत आहे याचा सर्वाना सार्थ अभिमान आहे. सोसायटीमध्ये सुद्धा मोहिनी नलावडे सौ. पूजा हवा आपल्या बँकेचे याचा काम चांगल्या चोखपणे पार पडतात याचा  आम्हाला अभिमान आहेया प्रसंगी सोसायटीचे सचिव, प्रकाश कदम यांनी सुद्धा महिला संचालक पूजा हवा मोहिनी नलावडे हे सोसायटीच्या कामकाजात  हिरिरीने भाग घेतात हे सांगितले. सोसायटीच्या उपस्थित सर्व संचालकांनी सुद्धा पूजा हवा मोहिनी नलावडे यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास दिनाच्या संचालक कर्मचारी उपस्थित होते.  


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*