मोदी सरकार मदतीसाठी तिजोरी उघडण्याची शक्यता ?; १.५ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात येणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मोदी सरकार मदतीसाठी तिजोरी उघडण्याची शक्यता ?; १.५ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात येणार
__________________________________


 कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी लॉकडाऊन केले आहे. याचबरोबर त्यांनी देशाला आर्थिक नुकसान होणार असून यापेक्षा देशवासियांचा जीव वाचविणे खूप महत्वाचे असल्याचे मोदी म्हणाले होते. यामुळे हे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकार तब्बल दीड लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. याची माहिती असणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत.
सरकारने अद्याप पॅकेजला अंतिम रूप दिलेले नाही. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत, असे या सूत्रांनी एनबीटीला सांगितले आहे. सूत्रांपैकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रोत्साहन पॅकेज २.३० लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. परंतू अंतिम आकडेवारीवर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. या आठवड्याच्या अखेरीस याची घोषणा केली जाऊ शकते. 
हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. 
भारतामध्ये बुधवारी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. देशात आतापर्यंत ५६२ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर १२ जणांचा मृत्य़ू झाला आहे.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image