सिग्नलवर फुगे विकून गुजारा करणाऱ्यांवर कोरोनामुळे उपाशी राहण्याची वेळ. 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


सिग्नलवर फुगे विकून गुजारा करणाऱ्यांवर कोरोनामुळे उपाशी राहण्याची वेळ.



जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशात तसेच महाराष्ट्रात नागरिकांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्वच स्तरातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांच्या कामगारांना  पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पगारी सुट्टी देण्याचे व घरातून बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शहराचे रस्ते सुमसाम झाले आहेत.  सिग्नल ओसाड पडले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लॉक डाउन करण्यास सांगितले आहे. परंतु सिग्नलवर फुगे व इतर साहित्य विकून,  आपला गुजारा करणाऱ्यांवर उपाशी राहण्याची  वेळ आली आहे. या नागरिकांबरोबर दरवर्षी विविध उपक्रम घेऊन त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्याचा प्रयत्न आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतो. गेल्या काही दिवसापासून शहरात गर्दी नसल्याने या नागरिकांना छोट्या मोठ्या वस्तू विकून काही पैसे मिळायचे व त्यातून त्यांचा प्रपंच चालायचा परंतु आता उपास मारीची वेळ आली असून त्यांनी अमित बागुलांशी संपर्क केला व सर्व त्यांची परिस्थिती सांगितली. मी त्यांना आठवडाभर पुरेल एवढे साहित्य त्यामध्ये चहापत्ती,साखर,डाळ,तेल,तांदूळ, साबण, हळद व मसाले  दिले असून पुणे शहरात असे हजारो नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पुणे शहरातील विविध संघटना, एनजीओ व नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्याला जमेल तशी या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन अमित बागुल यांनी केले . 


यावेळी सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, विजय डोळस, राजू शिंदे आदी उपस्थित होते.   


 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*