ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून पहाणी


            पुणे, दिनांक 30- कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


            जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. ससून हॉस्पीटलची नवीन इमारत अकरा मजली असून सहाव्‍या व नवव्‍या मजल्‍यावर रिफ्यूजी एरिया आहे.  इमारतीतील सर्वच मजल्‍यावर आयसोलेशन बेड्सची सोय करण्‍यात येणार आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता  विभागाचे व्‍यवस्‍थापन ही जबाबदारी देण्‍यात आली आहे. पहाणीनंतर अधिष्‍ठाता कक्षात बैठक घेण्‍यात आली. बैठकीत इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्‍ध मनुष्‍यबळाच्‍या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली. कोरोनाच्‍या मुकाबल्‍यासाठी शासनाचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्‍याचे आव्‍हान पूर्ण करु, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image