सरगम' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण  (दिगग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
सरगम' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण 


(दिगग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा )
 


 'सरगम' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नवी मुंबईच्या आमदार मंदाताई म्हात्रे व महापौर जयंवत सुतार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी मा. खासदार संजीव नाईक, कल्पनाताई नाईक, मा. आमदार संदीप नाईक, कल्याणताई नाईक, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, रुपाली भगत, श्रद्धा गवस तसेच चित्रपटाचे निर्माते प्रसाद पुसावळे, एम. के. धुमाळ तसेच अभिनेते ऋत्विक केंद्रे, संजय परदेशी अभिनेत्री दिशा परदेशी, राजलक्ष्मी असे मान्यवर या वेळी उपस्थित होते. 


 


              ‘सरगम’ हा चित्रपट एक १६ - १७ वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा आहे. तसेच या चित्रपटात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक - अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही महत्वाची भूमिका आहे. आयुष्यात सर्व काही मिळविल्यानंतर हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलामध्ये निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच घालविते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका कर्नाड यांनी साकारली आहे.


 


               यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते म्हणाले, की वेगळ्या धाटणीच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट असून प्रत्येकाला नक्की आवडेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक शिव कदम हे असून निर्माते प्रसाद पुसावळे, महेंद्र केसरी, एम के धुमाळ  हे आहेत. या चित्रपटात ऋत्विक केंद्रे, दिशा परदेशी, यतीन कार्येकर, राजलक्ष्मी, संजय परदेशी, डॉ. सुधीर निकम अशा दिग्गज कलाकारांनी काम केले आहे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*