करोना ची दक्षता म्हणून...... पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद ठेवणार. १० व १२ वी परीक्षा सुरू राहतील............सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.राजेश टोपे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


राज्यात कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असून पुणे, पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद ठेवणार. १० व १२ वी परीक्षा सुरू राहतील. याशिवाय आज मध्यरात्रीपासून मुंबई, पुणे, नागपूरव ठाण्यातील जिम, स्विमिंग पूलसह नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. *सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांची माहिती*