वाडा चिरेबंदी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*वाडा चिरेबंदी*
🤝🤝🙏🤝🤝
    
ऐतिहासिक वाड्यांची जपणूक, हे त्या त्या घराण्यांच्या वंशजांच्या दृष्टीने, शिवधनुष्य पेलण्यासारखेच असते. 
राजगुरुनगरच्या जवळ, चास या गावी, पहिल्या बाजीरावांची पत्नी,काशीबाई यांचे माहेरची भव्य वास्तू, आजही इतिहासाच्या पाऊलखुणा, दिमाखाने जपते आहे. या भव्य वास्तूला, आम्ही नुकतीच सहकुटुंब भेट दिली. 
वाड्याचे दहाव्या पिढीचे वंशज, सुरेश चासकर,यांनी अत्यंत आपूलकीने, आम्हाला वाड्याची माहिती दिली. 
तांत्रिकदृष्ट्या अचूक तपशील, प्र के घाणेकरांच्या पुस्तकातून मिळवला असून, अभ्यासकांच्या दृष्टीने तो निश्चितच उपयुक्त आहे. 
   पर्यटनाच्या नाममात्र आनंदापेक्षा, इतिहासाचा जाज्वल्य अभिमान बाळगणा-यांनी, या वास्तूला जरूर भेट द्यावी, असा माझा आग्रह राहील.   
    🌸🙏🌸
 *आनंद सराफ*