पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पसार; प्रशासनाचे धाबे दणाणले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पसार; प्रशासनाचे धाबे दणाणले
___________________________________


देशात कोरोनाची साथ पसरल्याने लॉकडाऊन सुरु आहे.  कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोरोनाची लागण झालेले रुग्णच उपचारांवेळी पळून जात असल्याने खळबळ उडाली आहे. 
हा धक्कादयक प्रकार इंदौरमध्ये घडला आहे. एमआरटीबी हॉस्पटलमध्ये भरती असलला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तेथील डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. हॉस्पिटलमधून पळालेला हा रुग्ण अल्पसंख्यांक समाजातील असून ४२ वर्षांचा आहे. हा रुग्ण पळाल्याने एकच खळबळ उडाली. 
या रुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांसहडॉक्टरांना आणि पालिका प्रशासनाला खूप शोधाशोध करावी लागली. तबब्ल ५ तासांनी या रुग्णाला पुन्हा पकडण्यात आले. त्याला इंदौरच्या खजराना भागातून पकडण्यात आले. आता त्याच्या लपून बसण्यामुळे संपूर्ण परिसर सॅनिटाईज करावा लागत आहेत. रुग्णाला पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने आरोग्य विभाग योग्य प्रकारे उपचार करत नसल्याचा आरोप केला आहे. 
दरम्यान मध्य प्रदेशमध्ये आज पर्यंत ३९ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारीही ५ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये १७ वर्षांच्या मुलीचाही सहभाग आहे. यापैकी ४ रुग्ण एकट्या इंदौरमधीलच आहेत. तर ३९ पैकी २० रुग्णही इंदौरचे आहेत. आज सापडलेले पाचही रुग्ण स्थानिक असून त्यांनी कुठेही इतरत्र प्रवास केला नव्हता. यामुळे आज कोरोनाचा रुग्ण पसार झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या