*डेक्कन क्विन Express* कल्याणला का थांबत नाहीं?

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


हे आपल्याला माहीत आहे का ?
*डेक्कन क्विन Express* कल्याणला का थांबत नाहीं?


कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक ! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते ! पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही , ती म्हणजे ' दक्षिणेची राणी ' ' डेक्कन क्वीन ' ! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही ह्याचे नवल वाटतेय ना ! बरोबर !!
त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे . पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही . त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले . कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले . रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले , त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले .
आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला !


ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*