*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
नागरिकांनी दाखल्यांसाठी इमेलवर अर्ज करावेत- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि.19- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व सेतू व महा इ सेवा केंद्र पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना दाखले आवश्यक आहेत. त्यांनी दाखल्याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन करुन तहसिल कार्यालयाच्या इमेलवर पाठवावी, त्यामुळे सर्व नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने दाखले वितरित करण्यात येतील, असेही कळवण्यात आले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*