देवस्थानांचा निधी असंघटित कष्टकरी कामगारांच्या उपजिविकेसाठी उपयोगात आणावा :लोकजनशक्ती पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*देवस्थानांचा निधी असंघटित कष्टकरी कामगारांच्या उपजिविकेसाठी उपयोगात आणावा :लोकजनशक्ती पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*


पुणे:


 साथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्माण झालेली रोजगाराची गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने देवस्थानांचा निधी असंघटित, गरीब आणि कष्टकरी मजूर बेरोजगारांसाठी उपजीविकेच्या सुविधांसाठी, आरोग्य विषयक उपाय योजनासाठी उपयोगात आणावा ,अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 


लोकजनशक्ती पक्षाचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तातडीचे पत्र लिहून ही मागणी केली आहे . कोरॉना साथीच्या पार्श्व भूमीवर केंद्र आणि राज्य सरकारचा निधी या परिस्थितीमध्ये कमी पडत असल्याचे दिसून येत आहे .असंघटित मजूर, बांधकाम कामगार शेतमजूर आणि कष्टकरी यांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे .मोठ्या शहरात त्यांना राहणे आणि जेवणाच्या साधनांपासून वंचित रहावे लागत आहे. आगामी महिन्यात देखील हीच परिस्थिती कायम राहिल्यास या कष्टकऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवनावर गंभीर संकट ओढवणार आहे .त्यामुळे राज्य सरकारने निधी ची कमतरता असल्यास देवस्थानांचे निधी धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत ताब्यात घ्यावेत आणि त्यांचा योग्य विनिमय कष्टकऱ्यांच्या सुविधांसाठी आरोग्यासाठी खर्च करावा, असे संजय आल्हाट यांनी या पत्रकात म्हटले आहे.................................................
(