रुग्ण हक्क परिषदेच्या जिल्हा निरीक्षक पदाची यादी जाहीर*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*रुग्ण हक्क परिषदेच्या जिल्हा निरीक्षक पदाची यादी जाहीर*


*पुणे -* जिल्ह्या - जिल्ह्यात रुग्ण हक्क परिषदेचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी, गावोगावी परिषदेच्या शाखा नव्याने उभ्या करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेची प्रदेश कमिटीतील महत्त्वाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची केंद्रीय प्रधान कार्यालयात आज बैठक पार पडली.
          यामध्ये पुणे जिल्हा निरीक्षणपदी - प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील, औरंगाबाद जिल्हा निरीक्षकपदी प्रदेश सचिव संध्याराणी निकाळजे, ठाणे आणि रायगड जिल्हा निरीक्षकपदी प्रदेश समन्वयक तेजश्री पवार, परभणी जिल्हा निरीक्षकपदी चंद्रकांत सरवदे, अहमदनगर जिल्हा निरीक्षकपदी केंद्रीय प्रधान कार्यलय सचिव दीपक पवार, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक पदी परिषदेचे अध्यक्ष स्वतः उमेशजी चव्हाण काम पाहणार आहेत. 
       यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिलामेळाव्याचे आयोजन व परिषदेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त १८ मार्च रोजी प्रत्येक शाखा, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय प्रधान कार्यालयीन सचिव दीपक पवार यांनी दिली.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*