पोलीस मित्र संघटनेकडून कोरोना बद्दल जनजागृती कर्जत
पुणे प्रवाह न्युज पोर्टल

 

 

पोलीस मित्र संघटनेकडून कोरोना बद्दल जनजागृती

कर्जत,दि .15 गणेश पवार

            पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चिंचवली-डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात कोरोना विषाणू बद्दल जनजागृती मोहीम घेण्यात आली.पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत आवाहन करणारे पत्रक काढून आवाहन केले आहे.

              पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि जिल्हा सचिव सुप्रेश साळोख तसेच कार्यकर्ते यांनी भाऊसाहेब राऊत विद्यालयात जाऊन प्रत्येक वर्गात 

विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे काम केले. त्यात पोलीस मित्र संघटनेच्या वतीने कोरोना विषाणू बद्दल माहिती देणारे पत्रक तयार केले आहेत.कार्यकर्त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची आणि आरोग्य कसे ठेवायचे याबद्दल माहिती वाचून दाखवली.त्यावेळी सर्व वर्गातील विद्यार्थी हे आपण आजपासून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ असे आश्वासन पोलीस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिले.