पुणे प्रवाह न्युज पोर्टल
टंचाई ग्रस्त बिड गावासाठी नवीन पाईपलाईन योजना मंजुर...
जिल्हापरिषद उपाध्यक्षाने केले योजनेचे भुमिपुजन
कर्जत,दि . 15 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील बीड हे सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळखले जात असून त्या गावात उन्हाळयात पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या उद्भवत असते.त्या समस्येबद्दल स्थानिकी रहिवाशी यांच्याकडून सातत्याने पिण्याच्या पाण्याची मागणी होत होती. दरम्यान,ती मागणी लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने बीड गावासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतलं असून त्या योजनेचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे हस्ते करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील वासरे खोड्यातील बिड ग्रामपंचायत ही कायमस्वरुपी टंचाई ग्रस्त अशी ग्रामपंचायत असुन बिड गाव ,आदीवासी वाडी ,खाणीचीवाडी या गावात असणाऱी पाणी टंचाई दूर होणार असून जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे प्रयत्नाने बिड गावासाठी नवीन पाईप लाईन योजना मंजूर झाली आहे .या योजनेच्या कामाचे भुमीपूजन स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सदर पाणी पुरवठा योजने साठी नव लाखाचा नीधी मंजुर झाला असुन खाणीची वाडीतील बोअरवेलला बारा महिणे पाणी उपलब्ध असते या बोअरवेलचा उदभव म्हणून वापर केला जाणार आहे.
या भुमिपुजन कार्यक्रमावेळी बोलताना सूधाकर घारे यानी सागीतले की,निवडणूक प्रचार सभेत तत्कालीन आमदार सुरेश लाड याना ग्रामस्थांनी आश्वासन दिले होते.या आश्वासनाची पुर्तता आज झाली असुन बीड गावासाठी नवीन पाईप लाईन योजना मंजूर करण्यात आली आहे.आपल्या भागात एकही गाव टंचाई ग्रस्त राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन सुधाकर घारे यांनी यावेळी दिले. यावेळी माजी सभापती तानाजी चव्हाण,माजी नगराध्यक्ष शरद लाड तसेच बंडु तुरडे ,प्रमोद देशमुख, मारुती चव्हाण, बिड ग्रामपंचायत च्या सरपंच प्रभावती लोभी ,उपसंरपच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळ
बीड नळपाणी योनजेंच्या जलवाहिनी टाकण्याचे कामाचे शुभारंभ करताना सुधाकर घारे