पुण्यात सॅनिटायझर ,मास्क पुरेशा संख्येत उपलब्ध :उत्पादक ,वितरकांची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note


*पुण्यात सॅनिटायझर ,मास्क पुरेशा संख्येत उपलब्ध :उत्पादक ,वितरकांची माहिती* 
--------------------------
*कोरोना पासून बचावासाठी आरोग्यविषयक जनजागृती करणार*


पुणे :


'कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर   नागरिकांनी काळजी करू नये ,पुण्यात सॅनिटायझर ,मास्क पुरेशा संख्येत उपलब्ध आहेत ', अशी माहिती 'डीएम स्टॉप ' या सॅनिटायझरचे  उत्पादक ,वितरक, 'ग्रोवेल ट्रेंड्झ ' या  सॅनिटायझर उत्पादक कंपनीचे संचालक तरुण अहुजा ,'मेडिक्युअर ' चे संचालक कन्हय्या चौधरी, तरुण इंटरप्रायझेस चे संचालक मनोहरलाल अहुजा यांनी पत्रकाद्वारे दिली .   


जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे साथींचा संसर्ग टाळण्यासाठी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे,  ही आरोग्यदायी सवय आहे. त्यातही ६० टक्के अल्कोहोल बेस वापरून तयार केलेले सॅनिटायझर हे प्रभावी ठरतात. हे  सॅनिटायझर हातावर चोळल्यास ते साबणापेक्षा अधिक जागेपर्यंत पोहोचून स्वच्छता करते आणि तो भाग निर्जंतुक करते.  कोरोना चे रुग्ण भारतात ,पुण्यात सापडल्यापासून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे . काळजीपोटी मास्क घेऊन ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच  हात धुण्यासाठी सॅनिटायझरबाबत जागरूकता आणि  वापर वाढला आहे',असे तरुण अहुजा यांनी सांगितले. 


'पुण्यात ३ दिवसापूर्वी मास्क आणि  सॅनिटायझर पुरेशा संख्येने उपलब्ध राहतील का याबाबत वितरकांमध्ये शंका होती. मात्र, पुण्यात सॅनिटायझर ,मास्क चा पुरेशा संख्येत उपलब्ध आहेत ,नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही ,असे ' मेडिक्युअर ' चे संचालक कन्हय्या चौधरी  यांनी सांगितले. 


'कोरोना पासून बचावासाठी आरोग्यविषयक जनजागृती ,हात धुण्याची पद्धत,वेळा ,योग्य  सॅनिटायझर ची निवड ,योग्य वापर याविषयी जनजागृती करणे गरजेचे   आहे ,असे  ' तरुण इंटरप्रायझेस' चे संचालक मनोहरलाल अहुजा यांनी सांगितले . त्यासाठी सोशल मीडिया द्वारे ,तसेच पत्रके वाटून जनजागृती करणार असल्याची माहिती श्री गुरुनानक दरबार च्या वतीने बाबा ग्यानी इंद्रजित सिंग यांनी दिली . 
----------------------------------


................................................