कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच नागरिकांना अन्नधान्यांचा पुरवठा करणे गरजेचे.... नगरसेविका अश्‍विनी कदम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी आत्ताच थोड्यावेळापुर्वी जिल्हाधिकारी श्री नवल किशोर राम तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी,पुणे यांच्याशी संपर्क केला व नागरिकांचे अन्नधान्यविना होत असलेले हाल त्यांच्या कानावर टाकून या संदर्भामध्ये शासनाने त्वरित रेशनिंग चे दुकान चालू करावी व नागरिकांना रेशनिंगचे धान्य उपलब्ध करून द्यावेत ही मागणी केली. हातावर पोट असलेले,गोरगरीब, कष्टकरी हे गेले दहा पंधरा दिवस लाॅकडाउनमुळे अक्षरशा: उपासमारीची वेळ आली आहे असे त्यांना सांगितले.  
   या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी परवा  १एप्रिलपासून अन्नधान्य हे रेशनिंग दुकानांच्या द्वारे वाटप सुरू करणार असे सांगितले. रेशनिंग कार्ड होल्डर असतील त्यांना या रेशनिंग दुकानाच्या माध्यमातून लाभ घेता येईल. 
   परंतु ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाहीत किंवा अपडेटेड नाहीत अशांची एनजीओ,धर्मदायी संस्था किंवा शिवभोजन थाळी अशा विविध माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
     साधारण दहा एप्रिल पर्यंत एप्रिल महिन्याचे व दहा तारखेनंतर मे व जुन महिन्याचे असे एकंदरीत तीन अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे तरी कृपया या संदर्भामध्ये सर्वांनी नोंद घ्यावी. 
धन्यवाद..
नितिन कदम. 
(अध्यक्ष -पर्वती) धन्यवाद 
नितिन कदम. 
(अध्यक्ष -पर्वती)