अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे*   *दामिनी पथक,महिला पोलिसांचा सत्कार*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


press release


*अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे* 
 *दामिनी पथक,महिला पोलिसांचा सत्कार*पुणे :
     जागतिक  महिला दिनाचे औचित्य साधून अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल येथे महिला दिन मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.याप्रसंगी  गुन्हे शाखा, लष्कर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.  सुजाता शानमे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील दामिनी पथकातील सौ उमाळे ,सौ जाधव, सौ लेंगरे, श्री काळे हे कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए . इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी पोलीस आणि दामिनी पथक सदस्यांशी संवाद साधला. 


या सर्वांचे प्रशालेच्या प्राचार्या परवीन शेख मॅडम यांनी स्वागत केले.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यासमोर स्वसंरक्षणाचे धडे उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी दिले.  प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती परवीन शेख व प्रमुख पाहुण्या सौ सुजाता शानमे यांनी महिला सबलीकरण या विषयांवर विद्यार्थिनींशी हितगुज केले. शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील बक्षीस विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सौ नीलिमा साठे , नितीन  तोडकर यांनी केले.प्रशालेचे  क्रीडा शिक्षक मजीद  सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले................................................


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*