पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
· प्लम्बिंग प्रशिक्षणासाठी वाघोलीत सुसज्जलॅब· आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १५मार्च रोजी लॅबचे उद्घाटन ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी या स्वयंसेवीसंस्थेतर्फे समाजातील बेरोजगार तरुणांना प्लंबिंग कौशल्याचे अत्याधुनिक प्रशिक्षणदेण्यासाठी वाघोली येथे जक्वार व सुप्रीम पाईप्स या कंपन्यांच्या सहकार्याने 'प्लंबिंग लॅब' उभारण्यात आली आहे. रविवारी (१५मार्च) सकाळी १०.३० वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटनहोणार असून, गेरा बिल्डर्सचे श्री कुमार गेरा व श्रीमती रितूनाथानी डायरेक्टर सायबेज सॉफ्टवेअर तसेच रा स्व संघाचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख श्री मिलिंद देशपांडे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितरहाणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अभय मठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगभरात प्लंबिंगसंबंधी जागृती निर्माण व्हावी यासाठीदरवर्षी 11 मार्च रोजी जागतिक प्लंबिंग दिवसाचे आयोजन केले जाते. प्लंबर हा पुढीलकाळातील जलरक्षक, आरोग्य रक्षक व उत्तम पाणी वितरणव्यवस्थेचा शिल्पकार असणार आहे. वर्ल्ड प्लंबिंग दिवसाच्या निमित्ताने प्लंबिंग वप्लंबर या विषयासंबंधी समाजाची धारणा बदलावी, प्लंबिंग हा हीएक भरपूर धन देणारा व प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे अशी धारणा निर्माण व्हावी. प्लंबिंगबाबत समाजात जिज्ञासा निर्माण व्हावी व प्लंबिंग कामातून सुद्धा एक उत्तुंग करिअर निर्माण होऊ शकते असा विश्वासतरुणांमध्ये निर्माण व्हावा म्हणून एका भव्य प्लंबिंग स्पर्धेचे देखील आयोजन करण्यातआले आहे. या स्पर्धेत पुण्याच्या विविध भागातील सुमारे १५० प्लंबर्स भाग घेतील. यास्पर्धेसाठी रुपये १२,०००/- (बारा हजार) प्रथम पारितोषिक,रुपये ८०००/- (आठ हजार) द्वितीय पारितोषिक तर रुपये ५०००/- (पाचहजार) तिसरे पारितोषिक रोख रकमेच्या स्वरुपात दिले जाणार आहेत. या स्पर्धेचेपारितोषिक वितरण मगरपट्टा सिटीचे संचालक श्री उमेश मगर, व्हास्कॉनकंपनीचे सिद्धार्थ मूर्ती तसेच विलास जावडेकर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार श्रीसर्वेश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. पुढील काळात संस्थेला संपूर्ण भारतातीलसर्व राज्यांमध्ये प्लंबिंग प्रशिक्षणाची केंद्र उभी करायची असल्याने कार्यकर्ते,स्वयंसेवक व निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता लागणार आहे. या संबंधीअधिक माहिती www.apnaplumber.com या संकेत स्थळावर उपलब्धहोऊ शकते.
--
Warm Regards,Ayodhya Khetmalis +91 7875699261