राज्यात आणखी ५ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या १३० वर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


राज्यात आणखी ५ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या १३० वर
___________________________________


कोरोनाचा विळखा वाढतच चालला असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ नं वाढला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. सांगलीत तीन, कोल्हापूरमध्ये एक आणि पुण्यात एका रुग्णाला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात आज कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळल्यानं सगळ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात आज कोरोनाचे २० रुग्ण आढळले आहेत. यातील ९ रुग्ण मुंबईतील आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज मुंबईत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश आहे. यामुळे पालकांची काळजी वाढली आहे. 
आज राज्यात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी कस्तुरबा रुग्णालयात एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला बऱ्याच कालावधीपासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आज तिचा मृत्यू झाला. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राज्यात कोरोनानं घेतलेला हा पाचवा बळी आहे. त्यात्पूर्वी आज सकाळी वाशीतील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १३० रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे आतापर्यंत ७१९ रुग्ण आढळले असून यातले ६२ रुग्ण आज आढळून आहेत. त्यामुळे देशात कोरोना वेगानं हातपाय पसरत असल्याचं दिसून येतंय. कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेतल्यास महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळमधील १३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.