*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
'मेड इन पुणे'... एका आठवड्यात 1 कोटी चाचण्या करणारं 'किट' तयार; ICMRचाही होकार
__________________________________
कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देशात या विषाणूनं हातपाय पसरले असून, संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रयोगशाळेत किटची कमतरता भासत होती. टेस्ट करण्यासाठीची किट परदेशातूनच आयात करावी लागत होती. हीच अडचण लक्षात घेता पुण्यातल्या कंपनीनं 6 आठवड्यात संशोधन करून 100 टक्के स्वदेशी बनावटीची किट तयार केली आहेत. पुणेस्थित मायलॅबने आठवड्यातून 1 लाख किट निर्मिती करण्याचे आश्वासन दिले असून, एका किटनं 100 रुग्णांची तपासणी करता येणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे देशातल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)नंही याला मान्यता दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट बनवण्यात आली असून, त्याला देशातल्या FDA आणि Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) या संस्थांनीही परवानगी दिली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली. अतिशय कमी किमतीत ही कीट तयार करण्यात आली असून, त्यासाठी फार कालावधी सुद्धा लागलेला नाही.
पुण्यातल्या My lab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने ही किट तयार केलेली आहेत. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून, अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी बनवल्या आहेत. सध्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी भारत जर्मनीमधून ही किट्स मागवतो. मात्र जगभरात कोरोनाचा फैलाव झाल्यानं या किट्सला जगात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे भारताला महागड्या किमतीत ही किट्स खरेदी करावी लागतात. तसेच त्याचा तुटवडा असल्यानं भरमसाट किंमतही मोजावी लागते. पण पुण्याच्या या कंपनीच्या दाव्यामुळे आता भारताची अडचण काही प्रमाणात कमी होणार आहेत.
तसेच या किट्सचा दर्जाही अतिशय उच्च प्रतीचा असून, क्षमताही वाखाणण्याजोगी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतर सात तासांनंतरच तपासणीतून संबंधित व्यक्ती संक्रमित आहे की नाही हे समजते. या नव्या किटनुसार लागण झाल्याच्या फक्त अडीच तासांमध्येच कोरोना बाधिताचं निदान करता येणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*