ना.डॉ. नीलम गोर्हे. निर्भया केस गुन्हेगारांना फाशीऩतरची प्रतिक्रिया २० मार्च २०२०

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*निर्भया बलात्काराच्या आरोपीं आज फाशी उशीर झाला असला तरी आरोपींच्या शिक्षेबद्दल ठाम राहिलेल्या न्याय व्यवस्थेचे आभार... ना.डॉ.नीलम गोऱ्हे*


*वकिलांनी अशा घटनेत तरी माणुसकी दाखविण्याची गरज... ना.डॉ. गोऱ्हे*


मुंबई दि.२० :- दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणी अनेक प्रकारे अडथळे तयार करण्यात आले. दि. १९  रोजी मध्यरात्री पर्यंत देखील आरोपींच्या वकिलांनी फाशी टाळण्यासाठी अर्ज केला होता परंतु न्यायसंस्था आता ठाम निर्णायक भूमिका घेतली त्याबद्दल न्याय देवतेचे मनापासून आभार. आणि आज पहाटे   फाशी दिली. निर्णयाला प्रत्यक्षात आणला गेला त्यामुळे हजारो फिर्यादी पिडीत स्त्रियांना या ऐतिहासिक शिक्षेच्या उदाहरणातुन धीर मिळाला आहे. तसेच गुन्हेगारांना जरब बसले असे मत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. 


सकाळी ५ वा ऊठले आणि एका भीषण पर्वाचा कायदेशीर शेवट आज अपेक्षित होता,त्याची अनेक वर्षे वाट पहात होते,तो शेवट ५.३० ला झाला असे मत ना.डॉ.गोऱ्हे व्यक्त केले. 
निर्भयाने सहन केलेले दु:ख व वेदना, सर्व अजुनही आठवते आहे. अशा किती तरी निर्भया अजुनही जळत व मरत आहेत. आज कोणत्याही कारणाने विलंब झाला नाही त्याबद्दल त्यांनी न्याय देवतेचे आभार मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*