अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे......मा. शरद पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे.


एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहायता निधी'साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहायता निधी'साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्यांना कळविण्यात येते की सदर धनादेश प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करावेत.


- शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image