शिवकालीन अरबी, फारसी,संस्कृत व इतर शब्दांचा मराठी अर्थ

★★★पुणे प्रवाह न्युज पोर्टल★★★★


 


 


*शिवचरित्राचे अभ्यास व वाचन करणाऱ्या वाचकांसाठी व अभ्यासकांसाठी शिवकालीन अरबी, फारसी,संस्कृत व इतर शब्दांचा मराठी अर्थ (अ-अरबी फा-फारसी)*
*तुषार उमाळे* 
*(शिवचरित्र अभ्यासक लेखक वक्ते)*
*संपर्क-८९९९०७५४५२*
*(अ-अरबी फा-फारसी स.संस्कृत)*
---------------------------------------------------
१)मुजुमदार (फा-मुज्मअदार)-हिशेब तपासणीस किंवा वसुली कारकून 
२)डबीर(फा-दबीर)-लेखक 
३)सबनीस (फा-सफ्नवीस)-सेनालेखक
४)पागा (पायगाह)-अश्वशाळा 
५)सरनौबत(फा-सर्नोबत)-सेनानी 
६)बारगिर-धण्याचा(मालकाचा) घोडा ठेवणारा शिपाई     
७)शिलेदार (फा-सीलहद्दार) -स्वतःचा घोडा असणारा सैनिक
८)इस्तकबाल (अ.इस्तीकबाल) आरंभापासून 
९)दावा (दअवा)-शत्रुत्व 
१०)हशम-शिपाई 
११)हेजीब(अ. हाजीब)-वकील 
१२)सुरणीस (फा)-सनदा कौलनामे इ. लिहिणारा अधिकारी 
१३)वाकनीस(फा-वाकीआ+नविस)-बातमीदार 
१४)उमराव-सरदार 
१५)सला (अ.सलाह)-सख्य,तह 
१६)मुलाजमत (अ.मुलाझमत)-भेट १७)नामजाद (फा)-नियुक्त 
१८)मुस्तेद(अ. मुस्तइद्द)-सिद्ध 
१९)जामदार(फा)-वस्त्रागार व रत्नागार यावरील अधिकारी 
२०)सरकारकुण-वरिष्ठ लिपिक 
२१)अलबत (अ.अल्बत)-निश्चित 
२२)सदर-मुख्य कचेरी,न्यायव्यवस्था 
२३)हस्तपंजर- पंजा उठविलेले फरमान २४)करीना-हकिकत  
२५)अराबा(अ)-तोफ 
२५)सुतरनाल (फा.शुर्तुनाल)-उंटावरील तोफ २६)मागती-नंतर 
२७)हरीफी(फा)-धूर्तपणा 
२८)अस्मानगिरी(फा)-मांडव 
२९)तिवाशा(फा)-कशिदा काढलेली लहान बैठक 
३०)सतेह (अ)-यश 
३१)भांडे-तोफ 
३२)मंदिल-जरीचे पागोटे 
३३)चोळणा-सैल, विजार,तुमान
३४) फिरंग(फा)-तलवार 
३५)हूद्देकरी-शास्त्रवाहक 
३६)शिताब-त्वरा 
३७)जासूद-हेर 
३८)हरकारा-निरोप देणारा 
३९)जमदाड-लांब पल्ल्याची तलवार 
४०)मेन(फा.मियान)-तलवारीचे आवरण ४१)गलबला (अ.घलबा)-गडबड,धामधूम ४२)कातर-पट्ट्याचा हात 
४३)घोरंदर-भयंकर 
४४)प्यादा(फा.पियादा)-पायदळातील शिपाई 
४५)बाजे (फा. बअझी)-इतर,वरकड 
४६)बंकाईत-पहारेकरी
४७)मोकासा-गावच्या वसूलातील हिस्सा ४८)हवालदार-काही शिपायांचा नाईक 
४९)अंबर (फा)-कोठार,समग्री 
५०)कारखानीस-(फा)-सर्व खात्यांचा मुख्य लेखक,दप्तरदार 
५१)नाईक-मुख्य 
५२)नजरगुजार (अ.नझर फा.गुझार)-परीक्षा ५३)जामीन (झामीन)- हमीदार 
५४)हूजरात(अ. हुझुर) स्वतः राजाचे सैन्य 
५५) फितवाफंदा-(अ. फुतूर फा. फंद)-दगाबाजी,फसवणूक 
५६) जिन्नस (फा-जीन्स)वस्तू 
५७) पखालजी-पाण्याच्या पिशव्यांचा वाहक ५८)नालबंद (फा)- नाल ठोकणारा 
५९)जमनीस (फा.जमनविस)-वसुली अधिकारी 
६०)सुबा- प्रांत 
६१)कारकून-(फा)-हिशेब तपासणीस 
६१)रतीब (अ.रातीब)-खुराक 
६२)शाकारणे-छप्पर करणे 
६३)बिशा-माल
६४)जाबता (अ.झाबिता)-यादी 
६५)बदअंमल (फा) -कुकर्म,बेबंदशाही ६६)ज्याजती- अधिक
६७)हुजूर-दरबार 
६८)दिवाण-मुख्य कचेरी
६९)बकैद (फा)-स्वैर 
७०)दरोबस्त (फा)-बिलकुल
७१) कमावशी-वसुलीचे मुलकी काम 
७२)सरबरा-(फा. सर्बराह)- व्यवस्थापक ७३)दप्तरदार (फा)-कागदपत्रांचा अधिकारी ७४)मोकासबा-हिशेब पाठांतर 
७५)मजमु(अ)-वसुली 
७६)मुलकी-वसूलासंबंधी 
७७)अबदागिरी(आफ्ताबागीर)-मानाची छत्री ७८)घुरंग-१ चौरस माप
७९)तक्सिम-भाग 
८०)देसाई-वतनदार अधिकारी
८१) कबज-ताबा, अंमल
८२)पाटील-ग्रामाधिकारी 
८३)कुलकर्णी-पाटलाच्या हाताखालील अधिकारी 
८४)मिरासदार-वडिलोपार्जित वतनदार  
८५)हुडा,बुरुंज- तट 
८६)हूजरात- सरकार
८७)सणगे-वस्त्र 
८८)बरकंदाज-बंदूकधारी शिपाई 
८९)सैतीवाला-लहान भालेवाले 
९०)बरची-लांब भाला 
९१)बाजारबुणगे-गैरलढाऊ लोक 
९२)बेमोहिन-अपरिमित 
९३)मजल-टप्पा
९४)चखोट-चांगला 
९५)राऊत-घोडेस्वार 
९६)तहकीक-निश्चित 
९७)तर्फ-तालुका 
९८)दाबेगिन-लढाऊ बायका 
९९)शम्मा(फा)-दिवा 
१००)गलबा-गडबड 
१०१)खोजा-जनानखान्यातील कंचुकी १०२)फितवा-स्वामीद्रोह
१०३)इतबार(अ. इयतीबार)-विश्वास १०४)तश्रीफ-बहुमानाचा पोशाख 
१०५)जोरावर-बलवान 
१०६)हारोळी-आघाडी 
१०७)जेजाल-नळीची बंदूक 
१०८)खानाजाह-दासीपुत्र 
१०९)अलाहिदा-निराळे 
११०)नामोश-कीर्ती 
१११)एल्गार-चढाई 
११२)पेंढारी-लुटारू घोडेस्वारांची टोळी ११३)देवडी-दाराजवळची नोकरचाकर बसण्याची जागा 
११४)निशान(फा)-पताका 
११५)फहमींदा(फा.फहमन्द)-जाणता 
११६)अर्जदस्त(फा. अर्ज-दस्त)-विनंती पत्र ११७)हौदा-हत्तीवरील बसण्याची कठडेदार जागा 
११८)सदरहू-उपरिनिर्दिष्ट  ११९)कंबरबस्त(फा.कामर्बस्त)-सिद्ध 
१२०)मजलस(अ.)-सभा 
१२१)निखालस (अ)-निर्भीड 
१२२)हजरत (अ.हुजूर)- स्वामी 
१२३)मुतालिक (अ)-उपमंत्री,नायब प्रतिनिधी 
१२४)गज - २४ तसू लांब 
१२५)गिल्ला(फा.गिलाह)-तक्रार
१२६)कोतवाल-शहराचा मुख्य संरक्षक १२७)राबता(अ.रबिता)- ये-जा 
१२८)साज(फा.साझ)-पोशाख 
१२९)सर्फराजी(फा)-बढती 
१३०)तसलीम-वंदन,आदर 
१३१)दावेदार (फा.दवाआदार)- शत्रू 
१३२)पतक-घोडे स्वारांचा समुदाय
१३३)सकलाद(अ.) शेंदरी,निळे कापड १३४)अबनाक-म्यानाचे वरचे व खालचे टोपण 
१३५)निसबत-संबंध 
१३६)उपराळा-सहाय्य,मदत 
१३७)मुलाज-भेट 
१३८)इलाखी(अ. हलाखी)-दुर्दशा
१३९)वस्तभाव-विविध जिजा 
१४०)कज्जा(अ. काझीया-)तंटा,वाद  १४१)नफरी(अ)हलकी सेवा 
१४२)फर्जंद-दासीपुत्र ??
१४३)चिटणीस-पत्रलेखक 
१४४)गोमेद-गोमूत्राचा रंगाचे रत्न 
१४५)पौडूर्य-रत्नाचा प्रकार,नीलोत्पल १४६)पुतळी-चार रुपयांचे सोन्याचे नाणे १४७)इब्रामी-बादशहाचे नाणे 
१४८)सतराजी-होनपुतळी 
१४९)अश्रफी- १५ रुपयांचे सोन्याचे नाणे  १५०)हमेनी-पैसे ठेवण्याचा लांब कसा १५१)बख्तर-लोखंडी जाळीचे चिलखत 
१५२)घुगी- शिरस्त्राण 
१५३)टीरी-पार्श्वभाग 
१५४)पाळेगार-डोंगरात राहणारे बंडखोर १५५)हबशी-अबिसीनियातील मनुष्य,सिद्दी १५६)गुराब-लढाऊ गलबत 
१५७)आरमार-(पोर्तुगीज शब्द-आर्मडा)-लढाऊ जहाजांचा तांडा १५८)पालान(फा)-खोगीर 
१५९)जेर(फा-झेर)-पराभूत 
१६०)रणखंदल(संस्कृत-रनकृंतल)-जंगी युद्ध 
१६१)खलक(अ. खल्क)-गैरमातब्बर लोक १६२)तरांडे -गलबत,मोठे तारू 
१६३)गलबत-तारू
१६४)शिबाड-मोठा मचवा 
१६५)दर्यासारंग-समुद्राधीपती 
१६६)वलंदेज-डच 
१६७)फिरंगाना-पोर्तुगिजांचा प्रांत 
१६८)अदमास-उद्योग-व्यवसाय 
१६९)आमदार फती(फा.आमद-इफ्त)-दळणवळण 
१७०)फना-नष्ट,उध्वस्त 
१७१)वहिलीमहाल -रथशाळा 
१७२)थटी महाल-गोशाळा 
१७३)चुनेगच्ची-चुन्याची आगाशी
१७४)कहीम-पुरातन 
१७५)फस्त-जमीनदोस्त,उध्वस्त
१७६)बिछाईत(अ. बीसात)-मालमत्ता १७७)अंगेंजनी-उठावणी,पराक्रम 
१७८)जम्बुरा(फा.झम्बुरा)-लहान तोफ 
१७९)हालखुद(अ. हाल फा.खुद्द)-आहे त्या स्थितीत 
१८०)जडाव-कोंदणात बसविलेला,खचित १८१)जाफा (अ. इजाफा)-वाढ 
१८२)फजित-अपमान 
१८३)ताबिन-स्वाधीन
१८४) बिदी-रस्ता 
१८५)दादमहल-न्याय मंदिर 
१८६)कंबरबंद-सिद्ध,तयार 
१८७)मेहमानी-आतिथ्य
१८८)कहीकबाड(फा.कही ही.कबाड) -दाणा वैरण,लाकूडफाटा नेणारे खंदक
१८९)दुई(फा)-यादवी बळी
१९०)तहद-पर्यंत
१९१) छबिना(फा.शबीना)-रात पहारा १९२)खुमास-सुंदर,उत्तम 
१९३)अजमास(फा.आझ्माईश)-अंदाज
१९४)इश्कबाजी-प्रणवविलास 
१९५)डौल-मानमान्यता 
१९६)खजिना(अ. खिजाना)कोषागार १९७)जवाहीरखाना(अ. जवाहिर     फा.खाना)-रत्नभांडार 
१९८)अंबारखाना-धान्यसंग्रह 
१९९)शरबतखाना -पेयस्थान 
२००)दफतरखाना(अ. दफत्तर फा.खाना)-लेखशाळा 
२०१)जामदारखाना-वस्त्रागार
२०२)जिराईतखाना(अ)-शस्त्रागार  
२०३)मुदबखाना-पाकालय 
२०४)उष्टरखाना-उंटशाळा 
२०५)तालीमखाना-व्यायाम शाळा २०६)पीलखाना-गजशाळा 
२०७)फरासखाना-(फा)राहुद्या,डेरे वगैरेचे स्थान 
२०८)आबदरखाना-जलस्थान 
२०९)शिकारखाना-पारधी पशुपक्ष्यांची जागा 
२१०)राहतखाना-आरोग्यगृह 
२११)सौदागी-व्यापार 
२१२)तोफखाना-तोफांची जागा 
२१३)नगारखाना-वाद्यगृह 
२१४)दारूखाना-तोफेला लागणाऱ्या बारुदाची जागा
२१५)सेरी-खाजगी
२१६)दरुनी-जनाना, अंतःपूर...
*टीप-आपल्या ज्ञानात भर पडल्यास प्रतिक्रिया द्या व इतरांकरिता शेयर नक्कीच करा..*
*तुषार उमाळे*
*शिवव्याख्याते-८९९९०७५४५२*