नेरळ मध्ये अवैद्यपणे गुटख्या विक्री विरुद्ध पोलीसांची सर्च मोहीम..... मात्र पोलिसांना चकवून होलसेल विक्रेत्या कडून सकाळी विक्री,, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष चढ्या भावाने विकला जातोय गुटखा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


नेरळ मध्ये अवैद्यपणे गुटख्या विक्री विरुद्ध पोलीसांची सर्च मोहीम.....

मात्र पोलिसांना चकवून होलसेल विक्रेत्या कडून सकाळी विक्री,,

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष

चढ्या भावाने विकला जातोय गुटखा

कर्जत,दि. 27 गणेश पवार

                         कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या गुटखा विक्री जोरात सुरू आहे.पान टपरी वर मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असून प्रसिद्धी माध्यमांनी त्यावर जोरदार आवाज उठवला आहे. दरम्यान,नेरळ पोलिसांनी पान टपऱ्या तपासण्यास सुरुवात केली असून बेकायदा गुटखा विक्री विरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी असलेले अन्न आणि औषध प्रशासन यांच्या कारवाई कडे लक्ष लागून राहिले आहे.मात्र पोलिसांची नजर असल्याने गुटखा पाकिटे होलसेल मध्ये विकणारे सकाळी आठ पूर्वी माल विकून मोकळा होत असल्याचे बोलले जात आहे,परिणामी अपुऱ्या पुरवठ्यामुळे नेरळ मध्ये चढ्या भावाने गुटखा विकला जात असल्याचे समोर आले आहे.दरम्यान,नेरळ पोलीस आणि औषध प्रशासन कधी बेकायदा गुटखा विक्रीवर नियंत्रण आणणार?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

                          कर्जत तालुक्यातील सर्व भागात अनधिकृतपणे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला तंबाखू मिश्रित गुटखा विकला जात आहे.याबाबत स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविल्यावर तालुक्यातील सर्रास होणारी गुटखा विक्री थांबली असून आता लपून छपून गुटखा विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.नेरळ मध्ये पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्यातील 16 पोलिसांवर दोन दोन च्या गटाने सर्व पान टपरी यांची झडती घेण्यास पाठवले आहे.त्या सर्च ऑपरेशन मधून खरी माहिती पोलिसांच्या कानावर पडणार असून बेकायदा गुटखा विक्री वर शासनाचे निर्बंध असताना देखील मोठ्या प्रमाणात होणारी होलसेल विक्री थांबली आहे.पंरतु नेरळ भागात भल्या पहाटे होलसेल गुटखा व्यवसाय करणारे पान टपरीवर जाऊन गुटख्याची पाकिटे पोहच करीत असल्याचे बोलले जात आहे. सकाळी आठ पूर्वी माल पोहचवून होलसेलर हे सायंकाळ झाली की सकाळी दिलेल्या मालाची वसुली करायला पोहचतात.

                           कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसाय सुरू असून त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे गुटखा खातात.त्यामुळे सर्व भागात गुटखा बंदी चे नियम कडक केल्याने चोरट्या मार्गाने गुटखा त्या गिर्हाईक यांना दिला जात आहे.ही बाब लक्षात घेऊन आता गुटखा चढ्या भावाने विकला जात आहे.पोलिसांची कारवाई होत असल्याची भीती दाखवून होलसेल व्यवसाय करणारे गुटखा विक्रेते हे दुपटीच्या दराने गुटखा विकत असल्याची माहिती समोर आली आहे.त्यात सामान्य गिर्हाईक पान टपरी वर गुटखाचे पाकीट मागायला गेला की विकत नाहीत अशी उत्तरे येतात.पण नेहमी चया गिर्हाईक याला गुटखा त्याच पान टपरी वर मिळतो.याशिवाय नेरळ रेल्वे स्थानक समोरील परिसरात गुटखा विकणारे लोक देखील असून ते आपल्या सोबत गुटखा बाळगून रस्त्यावर फिरून नेहमी च्या गिर्हाईक यांना गुटखा सहज उपलब्ध करून देतात.त्यामुळे गुटखा खाणारे यांचे चोचले पुरविले जात असून त्यांना चढ्या भावाने गुटखा विकत घ्यावा लागत आहे,त्याचवेळी विकणारे आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

                            त्यात नेरळ पोलिसांनी केलेले सर्च ऑपरेशन फेल गेल्याची चर्चा असून खुलेआम गुटखा विक्री होत नसली तरी नेरळ मध्ये चोरीने आणि चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू आहे.त्यामुळे नेरळ पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन त्या गुटख्याच्या विक्रीवर कसे नियंत्रण मिळविणार?यावर बरेच अवलंबून आहे.मात्र माध्यमांनी आवाज उठवल्याने गुटखा विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत,पण गुटख्याची विक्री काही बंद झाली नाही.मात्र अन्न आणि औषध प्रशासन नेरळ मधील या बेकायदा गुटखा विक्री बाबत सकारात्मक दिसत नाही.कारण त्यांची कारवाई करण्याची जबाबदारी असून आणि त्यांना अधिकार असून देखील एकही अधिकारी गुटखा विक्रेते यांना पकडण्यासाठी धाडी टाकत नाही.त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून बेकायदा आणि बंदी असलेल्या गुटखा विक्री बाबत कारवाई करीत नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*